वृत्तसंस्था
सिलिगुडी – राहुल आणि प्रियांका गांधी काँग्रेसला नवसंजीवनी देण्याच्या प्रयत्नांमध्ये असताना पक्षाला एका पाठोपाठ एक झटके बसताना दिसत आहेत. आज तर काँग्रेसच्या प्रति गेल्या चार पिढ्या निष्ठा राखून असणाऱ्या बड्या परिवाराने काँग्रेसशी आपले जुने घट्ट नाते तोडून टाकले आहे.Uttar Pradesh Congress; Veteran leader Kamalapati Tripathi’s grandson and great-grandson Mamata joins Trinamool Congress
पहिले पंतप्रधान पंडित नेहरू आणि इंदिराजींच्या काळातील उत्तर प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री आणि काँगेसचे दिग्गज नेते कमलापति त्रिपाठी यांच्या नातू आणि पणतूने आज काँग्रेसचा हात सोडून ममता बॅनर्जी यांच्या तृणमूळ काँग्रेसचा हात पकडला आहे.
कमलापति त्रिपाठी एवढे दिग्गज नेते होते की इंदिराजी देखील त्यांचा राजकीय सल्ला मानत असत. ते अनेक वर्षे केंद्रीय मंत्री आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. राजीव गांधी यांच्या पंतप्रधान पदाच्या काळात कमलापति त्रिपाठी अखिल भारतीय काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष होते. त्यांचे चिरंजीव लोकपति त्रिपाठी उत्तर प्रदेशमध्ये अनेक वर्षे मंत्री राहिले होते.
Siliguri: UP Congress leaders Rajesh Pati Tripathi and Lalitesh Pati Tripathi join TMC in the presence of West Bengal CM Mamata Banerjee and party leader Abhishek Banerjee. pic.twitter.com/bcibkgwWlh — ANI (@ANI) October 25, 2021
Siliguri: UP Congress leaders Rajesh Pati Tripathi and Lalitesh Pati Tripathi join TMC in the presence of West Bengal CM Mamata Banerjee and party leader Abhishek Banerjee. pic.twitter.com/bcibkgwWlh
— ANI (@ANI) October 25, 2021
लोकपतिंचे चिरंजीव आणि कमलापतींचे नातू राजेशपति त्रिपाठी काँग्रेसचे आमदार राहिले आहेत. तर राजेशपति त्रिपाठी यांचे चिरंजीव आणि कमलापतींचे पणतू ललितेशपति त्रिपाठी आमदार राहिले आहेत.
संपूर्ण उत्तर प्रदेशावर एकेकाळी राजकीय दबदबा असणारा एक मोठा परिवार आता काँग्रेसपासून दूर होऊन तृणमूळ काँग्रेसमध्ये सामील झाला आहे. यातून ममता बॅनर्जी यांची राजकीय दिशा स्पष्ट होताना दिसते आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App