काँग्रेसचे तिकीट मागणाऱ्या इच्छुकांनी अर्जाबरोबर 11 हजारांची देणगी जमा करावी; यूपी प्रदेशाध्यक्षांचे आदेश


वृत्तसंस्थाRC

लखनौ : उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसचे अर्ज तिकीट मागणाऱ्या इच्छुकांसाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय कुमार लल्लु यांनी आदेश काढले आहेत. इच्छुकांनी आपल्या अर्ज करण्याबरोबरच अकरा हजारांची देणगी पार्टी ऑफिसकडे जमा करावी, असे हे आदेश आहेत.Uttar Pradesh Congress Committee president Ajay Kumar Lallu has asked party ticket seekers to donate Rs 11000 along

उत्तर प्रदेशात प्रियंका गांधी या काँग्रेसच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील, असे सलमान खुर्शीद यांनी आधीच जाहीर केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेचे निवडणूक लढविणाऱ्या काँग्रेसने प्रत्येक इच्छुकाकडे अकरा हजारांची देणगी मागितली आहे. त्यामुळे हा राज्यात चर्चेचा विषय ठरतो आहे. विधानसभेतील इच्छुकांना निवडणूक लढवण्यासाठी तिकीट मिळवण्यासाठीच देणगी द्यावी लागत असेल तर प्रत्यक्ष निवडणूक लढवण्यासाठी काय करावे लागेल?, असा सवाल राजकीय वर्तुळात विचारण्यात येत आहे.

त्याचबरोबर काँग्रेसच्या आर्थिक स्थितीची देखील राजकीय वर्तुळात चर्चा रंगताना दिसत आहे. उत्तर प्रदेशात काँग्रेस सध्या चौथ्या स्थानावर आहे. त्यांच्या खासदारांची संख्या सिंगल डिजिटमध्ये तर आमदारांची संख्या फक्त डबल डिजिटमध्ये आहे.

Uttar Pradesh Congress Committee president Ajay Kumar Lallu has asked party ticket seekers to donate Rs 11000 along

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात