उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने जय्यत तयारी सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून भाजपाच्या संघटनेत महत्वाचे फेरबदल केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय ए. के. शर्मा यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे.
विशेष प्रतिनिधी
लखनऊ : उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने जय्यत तयारी सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून भाजपाच्या संघटनेत महत्वाचे फेरबदल केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय ए. के. शर्मा यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. Uttar Pradesh Assembly elections, Prime Minister Narendra Modi’s close a. K. Sharma appointed as State Vice President
शर्मा हे पंतप्रधानांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. ज्येष्ठ आयएएस अधिकारी आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रम विभागाचे सचिव असलेले शर्मा यांनी पदाचा राजीनामा देऊन अलिकडेच भाजपात प्रवेश केला होता. शर्मा उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री होणार अशीही चर्चा होती.
शर्मा यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांना विधान परिषदेच्या निवडणुकीची उमेदवारी मिळाली होती. या निवडणुकीत ते विजयी झाले. माझे आयुष्य केवळ देशाकरिताच असून, भाजपा माझा सन्मान आहे. कमळ हीच माझी ओळख आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच माझे आदर्श आहेत,
असे विजयी झाल्यानंतर त्यांनी स्पष्ट केले होते. उत्तरप्रदेशात पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक होत असून, शर्मा यांच्याकडे आणखीही काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपविण्यात येणार आहेत. शर्मा यांच्यासोबतच अर्चना मिश्रा आणि अमित वाल्मीकि यांची प्रदेश मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव यांनी या तिघांसह अन्य काही नियुक्त्या आज जाहीर केल्या. जितीन प्रसाद यांनी काँग्रेसचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केला. त्यांच्यामुळे राज्यातील राजकीय समीकरण बदलणार आहे. त्यांच्याकडे भाजपा काही महत्त्वाच्या जबाबदाºया सोपविणार आहे.
मुळचे मऊ येथक्षल असलेले अरविंदकुमार शर्मा हे गुजरात केडरचे आयएसएस अधिकारी आहेत. निवृत्तीला दोन वर्षे बाकी असताना ते सेवानिवृत्ती घेऊन सक्रीय राजकारणात उतरले आहेत. त्यांना विधान परिषदेवर पाठविल्यावर योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमध्ये मंत्री बनविले जाणार असल्याची चर्चा सुरू झाली होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App