वृत्तसंस्था
वॉशिंग्टन : इस्राईलच्या ‘एनएसओ ग्रुप’ या कंपनीने तयार केलेल्या पेगॅसस स्पायवेअरच्या माध्यमातून अमेरिकेच्या अधिकाऱ्यांचे फोनही हॅक केल्याचा दावा करण्यात आला आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्रालयातील सुमारे ११ अधिकाऱ्यांचे फोन काही व्यक्तींनी ‘पेगॅसस’चा वापर करून हॅक केले होते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. USA also facing pegasis spying issues
प्रसारमाध्यमांसंबंधित दोन सूत्रांच्या हवाल्याने अमेरिकी अधिकाऱ्यांवर पाळत ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यांत देशातील परराष्ट्रीय मंत्रालयातील अधिकाऱ्यांचे आयफोन टॅप करण्यात आले आहेत. हे बहुतेक अधिकारी हे युगांडात तैनात आहेत किंवा पूर्व आफ्रिकी देशांतील परराष्ट्र व्यवहारासंबंधी काम पाहत आहेत. ‘एनएसओ’ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अमेरिकेच्या अधिकाऱ्यांचे फोन हॅक करण्या ची व त्याद्वारे मोबाईल फोनमधून केलेली घुसखोरी ही सर्वांत मोठी घटना असल्याचे मानले जात आहे. याआधी काही अमेरिकी अधिकारी आणि अन्य नागरिकांचे मोबाईल क्रमांकांची एक यादी समोर आली होती. पण त्यातून हेरगिरी करण्याचा प्रयत्न केला होता किंवा त्यात यश मिळाले होते, हे स्पष्ट झाले नव्हते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App