जपानमधी क्वाड बैठकीत केले विधान; जाणून घ्या, असं का म्हणाले?
विशेष प्रतिनिधी
हिरोशिमा : पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता कोणापासून लपून राहिलेली नाही. मात्र आता जगातील बड्या देशांच्या प्रमुखांनाही पंतप्रधान मोदींच्या लोकप्रियतेची खात्री पटल्याचा प्रत्यय आला आहे. कारण, जगातील सर्वात शक्तिशाली देश असलेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे पंतप्रधान मोदींचे इतके चाहते झाले आहेत की त्यांनी त्यांचा ऑटोग्राफ घेण्याची इच्छा व्यक्त केली. US President Joe Biden said to Prime Minister Modi I should get your autograph
जपानमधील क्वाड मीटिंगमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन पंतप्रधान मोदींकडे आले आणि त्यांची गळाभेट घेतली ते संपूर्ण जगाने पाहिले. त्यानंतर आता बातमी आली आहे की क्वाड मीटिंग दरम्यान जो बायडेन यांनी पंतप्रधान मोदींना म्हटले की, ‘’ मला मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे, कारण तुमच्या(मोदींच्या) कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी मला अनेक प्रतिष्ठित व्यक्तिंकडून मोठ्याप्रमामवर अर्ज येत आहेत.’’ यानंतर जो बायडेन मोदींना म्हणाले की, ’’मी तुमचा ऑटोग्राफ घ्यायला हवा’’. मोदी जूनमध्ये अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
सिडनीमध्ये पंतप्रधान मोदींचा कार्यक्रम हाऊसफुल –
क्वाड बैठकीदरम्यान ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनीही पंतप्रधान मोदींच्या लोकप्रियतेचे कौतुक केले. ते म्हणाले की सिडनीमधील कम्युनिटी रिसेप्शनची क्षमता 20,000 लोकांची आहे, परंतु तरीही त्यांना या कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी इतके अर्ज येत आहेत की ते सर्वांना सामावून घेऊ शकणार नाहीत.
आपल्या भारत भेटीची आठवण करून देताना अल्बानीज म्हणाले की, नरेंद्र मोदी स्टेडियमवर 90,000 हून अधिक लोकांनी त्यांचे स्वागत केले होते. पीएम मोदी आणि ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी मार्चमध्ये भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट सामन्याला हजेरी लावली होती. सोमवारी पंतप्रधान मोदी जपानहून ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
पुढील वर्षी भारतात होऊ शकते क्वाड बैठक –
जपानच्या पंतप्रधानांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी G7 शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी जपानच्या दौऱ्यावर आहेत. जपानमध्ये ही क्वाड बैठक आयोजित केली जात आहे, जी आधी ऑस्ट्रेलियात होणार होती परंतु अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष त्यांच्या भेटीदरम्यानच मायदेशी परतल्यामुळे, क्वाड बैठक जपानमध्येच झाली. यादरम्यान पीएम मोदी म्हणाले की, भारताला 2024 मध्ये क्वाड बैठकीचे यजमानपद घेण्यास इच्छुक आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App