उत्तर प्रदेशच्या रामपूर जिल्ह्यात माजी राज्यपाल अजीज कुरैशी यांच्याविरोधात राजद्रोहाच्या आरोपाखाली आणि धर्माच्या आधारावर दोन गटांमध्ये शत्रुत्व वाढवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आणि राज्य सरकारविरोधात कथित अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी याबाबत माहिती दिली. UP police registered a case against former up governor aziz qureshi on a complaint of bjp leader aakash saxena
विशेष प्रतिनिधी
लखनऊ : उत्तर प्रदेशच्या रामपूर जिल्ह्यात माजी राज्यपाल अजीज कुरैशी यांच्याविरोधात राजद्रोहाच्या आरोपाखाली आणि धर्माच्या आधारावर दोन गटांमध्ये शत्रुत्व वाढवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आणि राज्य सरकारविरोधात कथित अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी याबाबत माहिती दिली.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, कुरेशी यांच्यावर भारतीय दंड विधान कलम 153 ए (धर्म, जात इत्यादींच्या आधारावर दोन गटांमध्ये वैमनस्य वाढवणे), 153 बी (राष्ट्रीय एकात्मतेला प्रतिकूल असे भाषण देणे), 124 ए (राजद्रोह) आणि 505 1B- (सार्वजनिक शांततेविरुद्ध गुन्हा करण्याच्या हेतूने खोटे विधान) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजप नेते आकाश कुमार सक्सेना यांनी रविवारी रामपूरच्या सिव्हिल लाईन्स पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केला होता. सक्सेना यांनी आरोप केला की, कुरैशी यांनी सपाचे नेते आझम खान यांच्या घरी जाऊन त्यांची पत्नी तजीन फातमा यांना भेटल्यानंतर अपमानास्पद वक्तव्य केले आणि योगी आदित्यनाथ सरकारची तुलना “राक्षस, भूत आणि रक्तपिपासू” यांच्याशी केली.
आकाश कुमार सक्सेना यांनी तक्रारीत म्हटले आहे, “कुरेशी यांनी त्यांच्या वक्तव्यात आझमविरोधातील कारवाईला माणूस आणि राक्षस यांच्यातील लढा असे म्हटले आहे. या विधानामुळे दोन समुदायांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो आणि समाजात अशांतता निर्माण होऊ शकते.” तक्रारीबरोबरच सक्सेना यांनी पोलिसांना विविध वाहिन्यांवर प्रसारित झालेल्या कुरेशी यांच्या वक्तव्याचा पेन ड्राईव्हदेखील दिला आहे.
कुरेशी (81) हे काँग्रेसचे एक ज्येष्ठ सदस्य होते, त्यांनी 2014-15 मध्ये मिझोरमचे राज्यपाल म्हणून काम केले. त्यांच्याकडे काही काळ उत्तर प्रदेशचा कार्यभारही होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाच्या सर्व पैलूंची चौकशी केली जात असून कायद्यानुसार कारवाई केली जाईल.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App