उत्तर प्रदेशातील ढासळलेल्या आरोग्य व्यवस्थेवर केंद्रीय मंत्री संतोष गंगवार यांनीच निशाणा साधला आहे. उत्तर प्रदेशातील अधिकारी फोनही उचलत नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना त्यांनी पत्र लिहिले आहे.Union ministers target Uttar Pradesh’s deteriorating health system, officials do not even pick up the phone
विशेष प्रतिनिधी
बरेली: उत्तर प्रदेशातील ढासळलेल्या आरोग्य व्यवस्थेवर केंद्रीय मंत्री संतोष गंगवार यांनीच निशाणा साधला आहे. उत्तर प्रदेशातील अधिकारी फोनही उचलत नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना त्यांनी पत्र लिहिले आहे.
गंगवार यांनी म्हटले आहे की, अधिकारी फोन उचलत नाहीत. हॉस्पिटल्समध्ये उपयोगात येत असलेले वैद्यकीय साहित्य दीड पटीने व्यापारी विकत आहेत. रुग्णांना रेफर करून दिशाभूल केली जात आहे. त्यांना दाखल केलं जात नाही.
एमएसएमई अतंर्गत ज्यांना ऑक्सिजन प्लांट उभे करायचे आहेत अशा बरेलीतील काही खासगी हॉस्पिटल्सना ५० टक्के सूट दिली जावी. यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा दूर होईल. करोना व्हायरसविरोधी लढाईत उपयोगी ठरत असलेले साहित्य व्यापारी दीडपटीने विकत आहेत.
यामुळे सर्व महत्त्वाच्या साहित्याचे दर निश्चित करावे. कमी कमी वेळत सूचवलेल्या हॉस्पिटल्समध्ये करोनाच्या रुग्णांना दाखल करून घ्यावं. रुग्णांची दिशाभूल करून त्यांना भरकटवलं जात आहे. हा चिंतेचा विषय आहे. यामुळे अनेक रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
ऑक्सिजन सिलिंडरचा मोठा तुटवडा आहे. याचे कारण शहरातील अनेक नागरिकांनी खबरदारी म्हणून ऑक्सिजन सिलिंडर्स आपल्या घरातच ठेवून घेतले आहेत. यामुळे विनाकारण सिलिंडर घरात ठेवणाऱ्यांवर कारवाई करावी आणि गरजू सुविधा पुरवावी.
तसंच साठवून ठेवलेली सिलिंडर मनमानी पद्धतीने विकले जात आहेत. शहरांचे आरोग्य अधिकारीही माझा फोनही उचलत नाही. रुग्णांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. सर्व खासगी हॉस्पिटल्स करोना रुग्णांना दाखल करून घेण्याची सुविधा दिली जावी, असे गंगावर म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App