Kiren Rijiju Car Accident : किरेन रिजिजू यांच्या कारला ट्रकची धडक, केंद्रीयमंत्री थोडक्यात बचावले!

Kiran rijiju

प्रवासादरम्यानचा व्हिडीओ केला आहे शेअर; जम्मूवरून ते श्रीनगरकडे जात होते.

विशेष प्रतिनिधी

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील बनिहालजवळ केंद्रीय कायदामंत्री किरेन रिजिजू यांच्या बुलेट प्रूफ कारला ट्रकने धडक दिल्याचे समोर आले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र केंद्रीय मंत्र्यांच्या गाडीचे काहीप्रमाणात नुकसान झाले आहे. Union Minister for Law and Justice Kiran Rijiju car met with a minor accident

मंत्री रिजिजू यांनी ट्विटरद्वारे माहिती दिली होती की, ते ‘कायदेशीर सेवा शिबीर’मध्ये सहभागी होण्यासाठी जम्मूहून उधमपूरला जात आहेत. त्यांनी सांगितले होते की न्यायाधीश आणि NALSA टीम सोबत केंद्र सरकारच्या योजनांचे अनेक लाभार्थी या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. यासोबत ते म्हणाले होते की, आता कोणीही व्यक्ती संपूर्ण प्रवासात सुंदर रस्त्याचा आनंद घेऊ शकतो.

अपघातानंतर सुरक्षारक्षकांची झालेली धावपळ कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या रस्ते अपघातात कुणालाही दुखापत झाली नाही.

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात