विशेष प्रतिनिधी
मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध पुरावे नसल्याचा अहवाल सीबीआयच्या तपासाधिकाऱ्यांनी देऊनही त्यांच्याविरुद्ध प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) नोंदविण्यात आला.Union Home Minister Amit Shah should resign, Congress spokesperson Sachin Sawant demanded
या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या नियंत्रणाखाली चौकशी करण्याची मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली. कोणाच्या इशाऱ्यावरून एफआयआर नोंदविण्यात आला, असा सवाल केला आहे. त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने देशमुख यांनी दरमहा १०० कोटी रुपये बार, हॉटेलमालकांकडून गोळा करण्यास सांगितल्याचा आरोप केला होता. त्याबाबत उच्च न्यायालयाने प्राथमिक चौकशी करण्यास सांगितले होते.
तेव्हा देशमुख व वाझे या दोघांची भेट झाल्याचे व गृहमंत्र्यांनी तसे सांगितल्याचे पुरावे नसल्याचा व चौकशी बंद करण्याचा अहवाल दिला होता. मात्र कोणाच्या इशाऱ्यावरून एफआयआर नोंदविण्यात आला, असा सवाल सावंत यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App