Union Budget 2023 : अर्थसंकल्पी संकल्पनांचे भारतीयकरण; मोदींचे मिशन सप्तर्षी; देशाच्या विकासाचे 7 दीर्घसूत्री प्राधान्यक्रम

प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने अर्थसंकल्पातल्या जास्तीत जास्त संकल्पनांचे भारतीयकरण केले असून 2023 – 24 च्या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाच्या विकासाची 7 दीर्घसूत्रे सादर केली आहेत. यालाच मोदींचे मिशन सप्तर्षी असे नाव दिले आहे. Union Budget 2023 : Indianization of Budget Concepts

यंदाच्या अर्थसंकल्पात 7 प्राधान्यक्रम सरकारने ठरवले आहेत आणि त्यावर आधारित मोठ्या तरतुदी अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी केल्या आहेत. देशाच्या विकासाची ही 7 दीर्घसूत्रे आहेत. यांनाच अर्थसंकल्पात सप्तर्षी असे संबोधले आहे.

अर्थसंल्पाचे सात प्राधान्यक्रम- सप्तर्षी

1.सर्वसमावेशक विकास
2. शेवटच्या घटकापर्यंत विकास
3. पायाभूत सुविधांचा विकास
4. क्षमतांमध्ये वाढ करणे
5. ग्रीन ग्रोथ
6. युवाशक्ती
7. आर्थिक क्षेत्र

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत आज अर्थसंकल्प मांडला. येत्या लोकसभा निवडणुकीपूर्वीचा मोदी सरकारचा आज शेवटचा संपूर्ण अर्थसंकल्प आहे. मोदी सरकारचा हा एकूण नववा अर्थसंकल्प आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीचा तसेच या वर्षात आठ ते दहा राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून यंदाचा अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे.

बजेटमध्ये कृषी क्षेत्रासाठी काय?

  •  कृषी स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन निधीची घोषणा
  •  हा निधी आधुनिक तंत्रज्ञानासाठी वापरला जाणार आहे
  •  स्वयंपूर्ण स्वच्छ वनस्पती कार्यक्रमासाठी 2200 कोटी रुपयांची घोषणा
  •  कापसासाठी क्लस्टर आधारित मूल्य साखळी योजनेची घोषणा
  •  पोषण, अन्न सुरक्षा आणि शेतकऱ्यांच्या हिताची काळजी घेतली जाईल
  •  कृषी स्टार्टअप्स निर्माणर सरकारचा भर. भारताला बाजरींचे जागतिक केंद्र बनविण्यावर भर.
  •  बचत गटांवर भर देऊन आर्थिक सक्षमीकरणावर सरकारचा भर असेल.
  •  सरकार कृषी क्षेत्रासाठी साठवण क्षमता- गोडाऊन वाढवणार आहे
  •  FY24 मध्ये कृषी कर्जाचे लक्ष्य 11.1% ने वाढून 20 लाख कोटी रुपये होईल
  •  पशुसंवर्धन, मत्स्यपालन, दुग्धव्यवसाय क्षेत्राला कर्ज देण्यावर भर द्या
  •  खासगी क्षेत्रातील R&D टीमसोबतही काम करेल
  •  बाजरीसाठी जागतिक स्तरावरील संशोधन संस्था बनवणार

Union Budget 2023 : Indianization of Budget Concepts

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात