विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: ‘पिगाससद्वारे हेरगिरीचे केल्याचे वृत्त हे संसदेच्या कामकाजात व्यत्यय आणण्यासाठी दिले गेले होते. तुम्ही घटनाक्रम समजून घ्या, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे. फूट पाडणाऱ्या आणि अडथळे आणणाऱ्या शक्ती षडयंत्राने भारताचा विकास मार्ग कधीही रोखू शकणार नाहीत.Understand the chronology of Pegasus’ spying reports, Union Home Minister Amit Shah alleges
पावसाळी अधिवेशन देशात विकासाचे नवे मापडंद स्थापित करेल, असेही त्यांनी सांगितले.शहा म्हणाले, माझ्याविरोधात बोलणारे हे वाक्य कायम हलक्या-फुलक्या अंदाजात बोललं जातं.
पण आज मी गंभीरतेने सांगतो, हा कथित रिपोर्ट लिक करण्याची वेळ आणि संसदेत त्यावरून व्यत्यय आणलं जाणं… ही क्रोनोलॉजी समजून घ्या! भारताच्या विकासात विघ्न आणणाऱ्यांचा भारत विकासात अडथळे निर्माण करण्यासाठी हा एक रिपोर्ट आहे. भारताचा विकास डोळ्यात खुपत असल्याने काही फूट पाडणाºया जागितक संघटना या मागे आहेत, असं शहांनी सांगितलं.
पिगासस हेरगिरी प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी, निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर आणि दोन केंद्रीय मंत्रांनाही लक्ष्य केल्याचं सांगण्यात येत आहे. मंत्र्यांमध्ये अश्विनी वैष्णव आणि प्रल्हाद पटेल असल्याचं बोललं जातंय.
‘द वायर’ने यासंदर्भात वृत्त दिलं आहे. एकूण ३०० भारतीयांच्या मोबाइल नंबरचा यात समावेश असल्याचं या वृत्तात म्हटलं आहे. ४० पत्रकार, तीन बडे विरोधी पक्षनेते, केंद्र सरकारमधील मंत्री, सुरक्षा यंत्रणांमधील विद्यमान आणि माजी अधिकारी आणि उद्योगपतींचा समावेश असल्याचं ‘द वायर’च्या वृत्तात म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App