Ayodhya : काका – पुतण्याच्या अयोध्या दौऱ्यात शिवसेना – मनसेचा असली – नकलीचा वाद!!


प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्र नव्याने तयार झालेल्या काका – पुतण्यांच्या जोडी आता अस्सल कोण आणि नक्कल कोण?? याचा वाद तयार झाला आहे. Uncle – nephew pair now who is genuine and who is fake

शिवसेनेचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यात हा वाद अधिक प्रखरतेने समोर आला आहे. राज ठाकरे 5 जूनला अयोध्येचा दौरा करणार आहेत. त्यासाठी मनसेने महाराष्ट्रातून 10 ते 12 रेल्वेगाड्या बुक केल्या आहेत.

पण त्याआधी आदित्य ठाकरे अयोध्येला जाऊन धडकणार आहेत. राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची पोस्टर्स आधीच अयोध्येत लागली होती. “राजतिलक की करो तयारी आ रहे हे भगवा धारी”, अशी ही पोस्ट होती. मनसेच्या या पोस्टरना शिवसेनेने आता प्रत्युत्तर दिले आहे, “आ रहा है असली नकली से सावधान: असे पोस्टर शिवसेनेने लावले आहे.

आजच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार अयोध्येत रामल्लांचं दर्शन घेऊन आले आणि त्यांनी आपण “अस्सल धार्मिक” असल्याची ग्वाही दिली. या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि मनसे यांच्यातील पुतण्या काकामध्ये असली – नकलीचा वाद रंगला आहे.

Uncle – nephew pair now who is genuine and who is fake

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात