उद्धव शिवसेनेची शरदनिष्ठ राष्ट्रवादीला लागण; दिल्लीत लागले गद्दारीचे बॅनर!!

प्रतिनिधी

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर उद्धव शिवसेनेचीच शरदनिष्ठ राष्ट्रवादीला लागण झाली. दिल्लीत शरदनिष्ठ राष्ट्रवादीने गद्दारांच्या निषेधाचे बॅनर लावले.Uddhav Shiv Sena’s fall to loyal nationalists; Banners of traitors started in Delhi!!

एकनाथ शिंदे यांनी बंड करून शिवसेनेत उभी फूट पाडल्यानंतर उद्धव शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांच्यावर “गद्दार” शब्दाचा मारा केला. गद्दार – गद्दार, खोके – खोके अशा घोषणा देऊन शिंदे गटाला हैराण केले होते. पण त्यामागे शिवसैनिकांचा जबरदस्त जोश होता. शिवसेनेचे राजकीय संस्कृतीच तशी आहे. ठाकरेंना सोडून गेलेले सर्व नेते त्यांच्या दृष्टीने गद्दार आहेत.



पण राष्ट्रवादीत आत्तापर्यंत तरी तेवढ्या तीव्रतेच्या विरोधाची राजकीय संस्कृती नव्हती. राष्ट्रवादीत अनेक नेते आले आणि गेले, तेव्हा फार कुठे गद्दारीचे बॅनर लागल्याचे दिसले नाहीत. पण आता अजितनिष्ठ आमदार शरद पवारांना सोडून गेल्यानंतर शरदनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी दिल्लीत गद्दारांचा निषेध करणारे बॅनर लावले.

शरद पवारांनी आपल्या गटाची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आज दिल्लीत बोलावली आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयाच्या आसपास त्यांच्या समर्थकांनी गद्दारांचा निषेध करणारे बॅनर लावले होते. पण ते आज सकाळीच दिल्ली महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काढून टाकले. पण तत्पूर्वी सोशल मीडियावर त्या बॅनरचे फोटो जोरदार व्हायरल झाले. त्यामुळेच शरदनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेसला उद्धव शिवसेनेची वैचारिक लागण झाल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली.

Uddhav Shiv Sena’s fall to loyal nationalists; Banners of traitors started in Delhi!!

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात