ट्विटरचे सीईओ डोर्सी यांची आरएसएस संबधित सेवा इंटरनॅशनल संस्थेमार्फत भारताला मदत ; उदारमतवाद्यांचा मात्र जळफळाट


  • आरएसएसशी संबंधित संघटनेस मदत दिल्याने उदारमतवादी भडकले .

  • कोरोना लढाईत ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डोर्सी यांनी भारताला १$ दशलक्ष डॉलर्स (ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोविड डोनेशन) मदत केली आहे. त्यापैकी त्यांनी सेवा आंतरराष्ट्रीय नावाच्या संस्थेला अडीच दशलक्ष डॉलर्स दिले आहेत. 

  • उदारमतवाद्यांनी सेवा आंतरराष्ट्रीय संस्थेला मदत करण्याबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत.

  • इस्लामवादी आणि डाव्या-उदारमतवाद्यांनी ‘भाषण स्वातंत्र्य’ आणि ‘धर्मनिरपेक्षता ‘ च्या नावाखाली हिंदू आणि त्यांची संस्कृती नेहमीच लक्ष केली आहे . Twitter chief Jack Dorsey donates to RSS-affiliate NGO Sewa to help in COVID relief in India, ‘liberals’ fume

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: कोरोनाच्या दुसर्‍या लाटेशी झगडणाऱ्या भारताला मदत करण्यासाठी ट्विटरने पुढाकार घेतला. भारताला ट्विटरने १.५ कोटी डॉलर म्हणजेच सुमारे ११० कोटी रुपयांची मदत केली. ही मदत तीन स्वयंसेवी संस्थांमार्फत केली जाणार आहे त्यापैकी एक  शिकागोस्थित सेवा इंटरनॅशनल ही संस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहे.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत या संस्थेला  भारतासाठी मदत दिल्याने भारतातील इस्लामवादी आणि उदारमतवादी (लिबरल्स) यांचा मात्र जळफळाट झाला आहे.त््यांनी जॅक डोर्सी यांना मदत मागे घेण्यास देखील सांगीतले .

सेवा इंटरनॅशनलचे मार्केटींग व्हाईस प्रेसिडेंट संदीप खाडेकर यांनी ट्विटरचे सीईओ डोर्सी यांचे  देणगी दिल्याबद्दल आभार मानले आहेत .तर दुसरीकडे यावर वाद सुरू आहे .

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरचे सीईओ जॅक डोर्सी यांनी कोरोना लढाईत ११० कोटी रुपये दान केले आहेत.त्यांच्या देणगीवर देखील वाद निर्माण केला जात आहे. दान केलेल्या पैकी काही रक्कम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित सेवा आंतरराष्ट्रीय संस्थेला देण्यात आली आहे.यावरुन हा वाद निर्माण झाला आहे.

सेवा आंतरराष्ट्रीय संस्था  हिंदू विचारधारेशी संबंधित एक मानवतावादी एनजीओ आहे. त्यांना मिळालेल्या निधीचा उपयोग कोविड  विरुद्धच्या लढाईत ऑक्सिजन केंद्रे, वेंटिलेटर , बीआयपीएप आणि सीपीएपी मशिन सारखी जीवनरक्षक उपकरणे खरेदी करण्यासाठी केला जात आहे.

अमेरिकेच्या टेक्सास शहरातील  सेवा इंटरनॅशनलला भारतातील कोरोना मदत कार्यांसाठी आतापर्यंत 7 दशलक्ष डॉलर्सचा निधी मिळाला आहे. याबाबतची माहिती संस्थेच्या वेबसाइटवर देण्यात आली आहे.

चिडलेल्या उदारमतवाद्यांनी डोर्सी यांना देणगी मागे घेण्याचे सुचवले

अनेक ट्विटर वापरकर्त्यांनी याबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत.त्यांनी म्हटले आहे की सेवा इंटरनॅशनलला दिलेली देणगी मागे घ्यावी.

शर्जील उस्मानीचे ट्विट-

सेवा संस्थेला दिलेल्या मदतीमुळे  इस्लामी शर्जील उस्मानी नाराज

सेवा इंटरनॅशनलचे स्वयंसेवक अमेरिका आणि भारत या दोन्ही देशांमध्ये कार्यरत आहेत. निधी जमा करण्याच्या कामात समन्वय साधतात, वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा करतात आणि ही रूग्णालये व संस्थांना मिळवून देतात.

Twitter chief Jack Dorsey donates to RSS-affiliate NGO Sewa to help in COVID relief in India, ‘liberals’ fume

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण