शिजानच्या नादी लागून तुनिषा हिजाब घालू लागली होती; शिजानच्या आई – बहिणीबरोबरचे मोबाईल चॅट पोलीसांच्या हाती

वृत्तसंस्था

मुंबई : टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येनंतर आता विविध खुलासे बाहेर येऊ लागले आहेत. यातून लव्ह जिहाद अँगल देखील समोर आला आहे. एक धक्कादायक खुलासा तुनिषाच्या आईने केला आहे. तुनिषाच्या आईने तिला सांगितले की, शिजान खान याच्या नादी लागून तुनिषा उर्दू बोलू लागली होती आणि ती तिच्या कुटुंबापासून दूरही गेली होती. Tunisha started wearing hijab following Shijan’s

तुनिषा उर्दूमध्ये बोलू लागली  

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी तुनिषाच्या कुटुंबीयांची भेट घेऊन निष्पक्ष तपास आणि न्याय देण्याचे आश्वासन दिले. जर शिजान दुसऱ्या रिलेशनशिपमध्ये असेल तर त्याने तुनिषाला सत्य सांगायला हवे होते. शिजानचे कुटुंब तुनिषा आणि तिच्या कुटुंबाला ब्लॅकमेल करत होते. तुनिषाला उर्दू प्रशिक्षण दिले जात असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. तुनिषाही उर्दूमध्ये बोलू लागली होती. तुनिषाचे काका पवन शर्मा यांनीही या प्रकरणात लव्ह जिहादचा संशय व्यक्त केला आहे. शिजानशी मैत्री केल्यानंतर तुनिशा हिजाब घालू लागली होती, असे पवन शर्मा यांनी सांगितले.

दरम्यान, तुनिषाचा मोबाईल डी कोड झाला असून ॲपल कंपनीचे अधिकाऱ्यांनी तो वाळीव पोलिसांच्या स्वाधीन केला आहे. या मोबाईल मधून तूनिषाचे शिजनच्या आई आणि बहिणी बरोबरचे चॅट देखील पोलिसांच्या हाती लागले आहेत. या चॅटच्या तपासातून आणखी काही महत्त्वपूर्ण खुलासे होण्याची शक्यता आहे.

शिजानचे अनेक मुलींशी संबंध होते  

तुनिषाने 24 डिसेंबर 2022 रोजी तिच्या टीव्ही शो “अली बाबा: दास्तान-ए-काबुल” च्या सेटवर आत्महत्या केली होती, त्यानंतर आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली शिजानला पोलिसांनी अटक केली होती. शिजानने तुनिषाची फसवणूक केली होती. शिजानचे अनेक मुलींशी संबंध होते. त्याने तिला लग्नाचे आश्वासन देऊन फसविले, असा आरोप तुनिषाच्या आईने केला आहे.

Tunisha started wearing hijab following Shijan’s

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात