तृणमूल काँग्रेस स्टार कॅम्पेनर यादीतून बाबुल सुप्रियो, खासदार नुसरत जहान यांना वगळले


वृत्तसंस्था

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भवानीपूर मतदार संघात पोटनिवडणुकीत विजय मिळवल्यानंतर तृणमूल काँग्रेस मध्ये काही “राजकीय दुरुस्त्या” करायचे ठरवलेले दिसत आहे. बंगालच्या उर्वरित तीन विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेसने जी स्टार कॅम्पेनरची यादी जाहीर केली आहे तिच्यातून भाजपमधून तृणमूल काँग्रेस मध्ये आलेले सेलिब्रिटी बाबुल सुप्रियो आणि वादग्रस्त खासदार नुसरत जहान जैन ही दोन्ही नावे वगळण्यात आली आहेत. Trinamool Congress dropped Babul Supriyo and MP Nusrat Jahan from the list of star campaignersबाबुल सुप्रियो यांनी ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाचा क्षमतेवर स्तुतिसुमने उधळत भाजपमधून तृणमूल काँग्रेस मध्ये प्रवेश केला होता. परंतु ममता बॅनर्जी यांच्या भवानीपूर मतदारसंघात त्यांनी भाजपच्या उमेदवार प्रियांका टिबरेवाल यांच्या विरोधात प्रचार करायला नकार दिला होता. प्रियांका टिबरेवाल यांच्याशी त्यांची वैयक्तिक मैत्री असल्याने नाही त्यांनी त्यांच्याविरोधात प्रचार करणे टाळल्याचे सांगण्यात येते. त्यांनी त्या वेळी ममता बॅनर्जी यांना तशी विनंती केली करून ते प्रचार सभांपासून बाजूला राहिले. आता तृणमूल काँग्रेस नेत्यांना स्टार कॅम्पेनरच्या यादीतून वगळून टाकले आहे.

खासदार नुसरत जहान जैन यांच्या यांच्या वैवाहिक जीवनातील वादळामुळे त्या गेले काही महिने चर्चेत आहेत. त्यांच्या मुलाचा पिता नेमका कोण?, या विषयी संभ्रम आहे. निखिल जैन यांच्याशी त्यांचा विवाह झाल्यानंतर काही महिन्यातच ते विभक्त झाल्याचे सांगण्यात येते. तृणमूल काँग्रेसच्या कार्यक्रमांपेक्षा नुसरत जहान यांची प्रसिद्धी वैयक्तिक कारणांसाठी जास्त राहिली आहे. त्याचा दुष्परिणाम तृणमूलच्या प्रचारावर होऊ नये या हेतूने त्यांचेही नाव स्टार कॅम्पेनर च्या यादीतून वगळले याचे सांगण्यात येते.

Trinamool Congress dropped Babul Supriyo and MP Nusrat Jahan from the list of star campaigners

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण