विशेष प्रतिनिधी
भुवनेश्वर : महिना केवळ साडेचार हजार रुपये पगार असलेल्या ओडिशातील आदिवासी आशा स्वयंसेविका मतिल्दा कुल्लू यांचा जगप्रसिद्ध फोर्ब्स या नियतकालिकाने जगातील सर्वाधिक प्रभावशाली महिलांच्या यादीत समावेश केला आहे. कोरोनाच्या काळात केलेल्या कामामुळे त्यांना हा सन्मान मिळाला आहे.Tribal Asha Worker with a monthly salary of Rs.4,500 is in Forbes list of most influential women in the world
सुंदरगड जिल्ह्याच्या बडागाव तालुक्यातील गर्गडबहल गावच्या रहिवासी असणाºया कुल्लू गेल्या 15 वर्षांपासून आशा स्वयंसेविका म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी जनजागृती करून या भागातील काळ्या जादूसारख्या सामाजिक समस्येचे समूळ उच्चाटन केले आहे.
त्यांच्या या कायार्चा गौरव करीत फोर्ब्सने प्रसिद्ध बँकर अरुंधती भट्टाचार्य आणि अभिनेत्री रसिका दुग्गल यासारख्या प्रतिभावान महिलांच्या बरोबरीने 2021 च्या यादीत कुल्लू यांचा समावेश केला आहे.कुल्लू यांच्या दैनंदिन कामाची सुरुवात पहाटे पाच वाजेपासून होते.
कुटुंबातील चार लोकांची जबाबदारी सांभाळणाऱ्या कुल्लू घरकाम आवरून सायकलवरून आशा स्वयंसेविकेच्या कायार्साठी घराबाहेर पडतात. गावातील प्रत्येक घरात जाऊन कोरोना लसीकरण, प्रसूतीपूर्व तपासणी, प्रसूतीनंतरची तपासणी, स्तनपान, महिलांच्या विविध समस्या आणि कोरोना संसगार्बाबत जनजागृतीचे काम त्या करतात.
मतिल्दा म्हणाल्या की, कोरोना महामारीनंतर माझी जबाबदारी आणखीच वाढली. कोरोनाची लक्षणे असणाऱ्या लोकांच्या तपासणीसाठी रोज गावातील 50 ते 60 घरांत जावे लागत असे. कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर लसीकरण करण्यासाठी लोकांना मला खूप समजावून सांगावे लागले. सध्या दरमहा 4,500 रुपये पगार मिळतो. मी माझ्या कामात आनंदी आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App