पोलिसांनी सामूहिक बलात्काराचा गुन्हा नोंदवत ४ महिलांना अटक केली आहे.जुन्या वादातून ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.Tragic incident in Delhi, a rape victim shaved; The mouth is black
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशाच्या राजधानीत एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे.दिल्लीमधील विवेक विहारमध्ये एका बलात्कार पीडित महिलेचं मुंडण करून तिच्या तोंडाला काळं फासण्यात आलं. त्यानंतर तिच्या गळ्यात चपलांचा हार घालून तिला गल्ल्यांमध्ये फिरवण्यात आलं.या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला.
महिलेच्या लहान बहिणीनं घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.या प्रकरणी पोलिसांनी सामूहिक बलात्काराचा गुन्हा नोंदवत ४ महिलांना अटक केली आहे.जुन्या वादातून ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.
नेमकी घटना काय घडली?
पीडित महिला विवाहित असून तिला एक लहान मुलगा आहे. ‘पीडित महिलेच्या घराच्या मागे राहणारा एक तरुण सतत तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचा.दरम्यान १२ नोव्हेंबरला त्यानं आत्महत्या केली.म्हणून तरुणाच्या आत्महत्येला शेजारचीच महिला जबाबदार असल्याचं त्या तरुणांना कुटुंबीयांनी वाटतं,’ असं पीडितेच्या बहिणीनं सांगितलं.
पीडित महिला ही विवेक विहारमध्ये एका भाड्याच्या घरात राहते.काल बुधवारी रात्री १२ च्या दरम्यान चाकूच्या धाकानं तिचं अपहरण करण्यात आल.तसेच सामूहिक बलात्कारानंतर तिचं मुंडण करण्यात आलं असून तिच्या तोंडाला काळं फासण्यात आलं.तिच्या गळ्यात चपलांचा हार घालून गल्लोगल्ली फिरवण्यात आलं, असा आरोप पीडितेच्या काकांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App