Tokyo Olympics Updates : मनु भाकरे सिमरनजीत कौरकडून निराशा : दीपिका कुमारी क्वार्टरफायनमध्ये- पदकापासून केवळ एक पाऊल दूर


  • रशियाच्या केस्नियावर केली मात, उपांत्यपूर्व फेरीत दिपीकासमोर कोरियाचं खडतर आव्हान

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताची महिला तिरंदाज दिपीका कुमारीची धडाकेबाज कामगिरी सुरुच आहे. रशियाच्या केस्निका पेरोव्हावर अटीतटीच्या लढतीत ६-५ ने मात करत दिपीकाने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे तिरंदाजीत किमान कांस्यपदक मिळवण्यासाठी दिपीकाला आता एका विजयाची तर सुवर्णपदकासाठी दोन विजयांची गरज आहे.  Tokyo Olympics Updates: Disappointment from Manu Bhakre Simranjit Kaur: Deepika Kumari in quarterfinals – just one step away from medal

1/8 Eliminations च्या पहिल्याच सेटची दिपीकाने चांगली सुरुवात केली. २८-२५ च्या फरकाने पहिला सेट जिंकत दिपीकाने २ सेट पॉईंट जिंकले. परंतू दुसऱ्या सेटमध्ये रशियाच्या केस्नियाने बरोबरी साधत सेट जिंकला. तिसऱ्या सेटमध्ये दिपीकाने आपला सर्व अनुभव पणाला लावत २८-२७ अशी एका गुणाच्या फरकाने बाजी मारली.



परंतू रशियाच्या केस्नियाने चौथा सेट बरोबरी सोडवत आणि पाचव्या सेटमध्ये ३ गुणांच्या फरकाने सेट जिंकत पुन्हा एकदा सामना बरोबरीत सोडवला. अखेरीस निकाल शूट ऑफमध्ये घेण्यात आला. ज्यात रशियाच्या केस्नियाने ७ तर दिपीकाने १० गुणांची कमाई करत आपला विजय निश्चीत केला. उपांत्यपूर्व फेरीत दिपीकासमोर कोरियाच्या अॅन सॅनचं आव्हान असणार आहे.

Tokyo Olympics Updates : Disappointment from Manu Bhakre Simranjit Kaur: Deepika Kumari in quarterfinals – just one step away from medal

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात