विशेष प्रतिनिधी
टोकियो : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने पहिले पदक जिंकले आहे. वेटलिफ्टर मीराबाई चानूने महिलांच्या 49 kg किलो वजन गटात एकूण 202 किलो वजन उचलून रौप्य पदक जिंकले. ऑलिम्पिकच्या पहिल्या दिवशी पदक जिंकणारी मीरा ही पहिली भारतीय खेळाडू आहे. चीनच्या हौ जिहुईने 210 किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले. इंडोनेशियाच्या कांटिका विंडीने कांस्यपदक जिंकले.
मणिपूरचे मुख्यमंत्री एन बीरेन सिंग यांनीही मीराबाईंशी थेट संवाद साधला. मीरा यांना मणिपूर सरकारने एक कोटी रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा त्यांनी केली आहे. बीरेन सिंग यांनी सोशल मीडियावर त्यांच संभाषण शेअर केले आहे.
So good to speak to our Champion @mirabai_chanu today.@narendramodi @AmitShah @ianuragthakur @JPNadda @blsanthosh pic.twitter.com/1phL16ibh3 — N.Biren Singh (Modi Ka Parivar) (@NBirenSingh) July 24, 2021
So good to speak to our Champion @mirabai_chanu today.@narendramodi @AmitShah @ianuragthakur @JPNadda @blsanthosh pic.twitter.com/1phL16ibh3
— N.Biren Singh (Modi Ka Parivar) (@NBirenSingh) July 24, 2021
बिरेनसिंग यांनी आनंद व्यक्त करताना सांगितले की मीराबाईंनी पदक जिंकले त्या वेळी गृहमंत्री अमित शहा यांच्यासह ईशान्येकडील सर्व मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक चालू होती. अशा स्थितीत बैठकी दरम्यान बिरेन सिंग यांनी पदक मिळवल्याची बातमी दिली आणि मग सर्वांनी उभे राहून मीराचे अभिनंदन केले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App