टोकियो ऑलिंपिक २०२०; दोन भारतीय पैलवानांची उपांत्य फेरीत धडक; रवी दहिया आणि दीपक पूनिया यांची चमकदार कामगिरी


वृत्तसंस्था

टोकियो : टोकियो ऑलिंपिक २०२० मध्ये दोन भारतीय पैलवान रवी कुमार दहिया आणि दीपक पूनिया यांनी चमकदार कामगिरी करत कुस्तीच्या आपापल्या गटात उपांत्य फेरीत धडक मारली आहे. Tokyo Olympics 2020; Two Indian wrestlers hit the semifinals; Shining performances by Ravi Dahiya and Deepak Pooniaरवी कुमार दहिया याने 57 किलो वजनी गटात जॉर्जी व्हेनग्लो याचा 1 – 4 ने पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला, तर दीपक पूनिया याने 86 किलो वजनी गटात चीनच्या चीजो शान या पैलवानाचा 1- 4 ने पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. यापूर्वी त्याने नायजेरियाच्या पैलवानाचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला होता.

आज बॉक्सर लवलीन बोरगोविन हिची उपांत्य लढत आहे. ती सुवर्णपदकासाठी बॉक्सिंग रिंग मध्ये उतरेल. तिला शुभेच्छा देण्यासाठी आसाममध्ये सर्वत्र दीपप्रज्वलन करण्यात आले.

मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मा यांनी जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये विविध खेळाडू आणि नागरिकांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून लवलीनला शुभेच्छा दिल्या. तिला सुवर्णपदक मिळावे म्हणून सर्वांनी प्रार्थना केली.

Tokyo Olympics 2020; Two Indian wrestlers hit the semifinals; Shining performances by Ravi Dahiya and Deepak Poonia

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण