मध्य प्रदेशात स्वातंत्र्यदिन सोहळ्याची पूर्वतयारी करताना अपघात, 3 कर्मचाऱ्यांचा मृत्यू; व्हिडिओ व्हायरल


विशेष प्रतिनिधी

ग्वाल्हेर : मध्य प्रदेश राज्यातील ग्वाल्हेर येथे ऐतिहासिक महाराज बाडे येथे दुर्दैवी अपघात घडला आहे. अपघातात तीन शासकीय कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. हे कर्मचारी हाइड्रोलिक फायर ब्रिगेडच्या माध्यमातून महानगरपालिका इमारतीवर तिरंगा झेंडा लावण्याची पूर्वतयारी करत होते.three Govt employees death in the preparation of independence day ceremony in Gwaliar Madhya Pradesh Video viral

महाराजा बाडे येथील ऐतिहासिक इमारतीवर मोठ्या प्रमाणावर प्रतिवर्षी स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. ही सर्व स्वातंत्र्य दिन सोहळ्याची पूर्वतयारी होती आणि सर्व कर्मचारी आपापल्या कामात व्यग्र होते. दरम्यान, नव्या वाहनात चुकीचे बटण दाबले गेल्याने ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. अपघातातील मृतांमध्ये महानगरपालिका चौकीदार आणि अग्निशमन दलाचे दोन जवानांचा समावेश आहे. तर फायरब्रिकेड चालक गंभीर जखमी आहे.



दरम्यान, या अपघाताची माहिती समजताच मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दु:ख व्यक्त करत ट्विट केले आहे. ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, ग्वाल्हेर येथील महाराजा बाडे येथील पोस्ट ऑफिस इमारतीवर मशीन अनलोड करताना दुर्घटना झाली. यात 3 कर्मचाऱ्यांचे निधन झाले. तर 3 गंभीर जखमी आहेत, ही दु:खदायक घटना समजली. मृतांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना. जखमींना लवकर आराम मिळो. ॐ शांती.

माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी म्हटले आहे की, ग्वाल्हेर येथे ध्वज लावताना क्रेनमध्ये अपघात होऊन काही लोकांचा मृत्यू आणि काही लोक गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली. पीडित कुटुंबांच्या प्रति माझ्या संवेदना. जखमी लवकर बरे व्हावे ही प्रार्थना. या घटनेची चौकशा व्हावी, ही आमची सरकारकडे मागणी आहे. दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी.

three Govt employees death in the preparation of independence day ceremony in Gwaliar Madhya Pradesh Video viral

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात