लसीवरून राजकारण पुन्हा तापणार, कॉंग्रेसशासित राज्यांची केंद्र सरकारवर सडकून टीका


विशेष प्रतिनिधी 

चंडीगड :  कोरोना लसीच्या पुरवठ्यावरून महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या टिकेनंतर आता देशातील अन्य कॉंग्रेसशासीत राज्यांनीही लसीच्या कमतरतेबाबत आवाज उठवायला सुरुवात केली आहे.Three Cong Govt. targets Modi Govt for shortage of vaccine

पंजाब, राज्स्थान व छत्तीसगड या कॉंग्रेसशासित राज्यांनी लसींचा पुरवठा तत्काळ वाढवण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्राच्या टीकेनंतर केंद्र सरकार खडबडून जागे झाले असून केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना आज महाराष्ट्रात आढावा घेण्यासाठी पाठवण्याची वेळ केंद्रावर आली आहे.



काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली आज काँग्रेसशासित राज्यांतील मुख्यमंत्र्यांची बैठक पार पडली. पंजाबकडे केवळ पाच दिवस पुरेल एवढाच लशींचा साठा असल्याचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग यांनी यावेळी स्पष्ट केले.

राजस्थान आणि छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी देखील केंद्राने लशींचा पुरवठा वाढवावा अशी मागणी केली आहे.पंजाबात प्रत्येक दिवशी ८५ ते ९० हजार लोकांचे लसीकरण केले जात असून हाच वेग भविष्यामध्ये कायम राहिल्यास आमच्याकडील लशींचा साठा येत्या पाच दिवसांमध्ये संपू शकतो

असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. राज्य सरकारचे लक्ष्य हे दररोज दोन लाख डोस देणे हे आहे. या पद्धतीने लसीकरण झाले तर सध्या राज्याच्या हाती असलेला साठा हा तीनच दिवसांमध्ये संपू शकतो..

Three Cong Govt. targets Modi Govt for shortage of vaccine

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात