शरद पवारांचा राजीनामा म्हणजे पूर्वनियोजित स्क्रीप्ट असल्याच्याही चर्चा आता सुरू झाल्या आहेत.
विशेष प्रतिनिधी
धारवाड : शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊ नये. त्यांनीच अध्यक्ष राहावे. त्यांचा राजीनामा नामंजूर केल्याचा ठराव त्यांनीच नेमलेल्या 15 सदस्यीय समितीने केला असून निर्णयाचा चेंडू या समितीने पुन्हा शरद पवारांच्या कोर्टात ढकलला आहे. यावर आता विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. सामान्य जनतेला तर हे सगळं स्क्रिप्टेड असल्याचही वाटत आहे. तर सर्व घडामोडींवर आता उपमुख्यमंत्री फडणवीसांनी प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीला टोला लगावला आहे. This is an internal film of NCP Devendra Fadnavis attack on Sharad Pawars resignation drama
कर्नाटकातील धारवाडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, ‘’हा राष्ट्रवादीचा अंतर्गत चित्रपट आहे. त्याचे कलाकारही अंतर्गत आहेत, त्याची पटकथाही अंतर्गत आहे. त्यामुळे जोपर्यंत सिनेमाचा शेवट होत नाही. तोपर्यंत यावर आम्ही काय प्रतिक्रिया द्यायची? त्यामुळे या पटकथेचा जेव्हा शेवट समजेल तेव्हाच यावर प्रतिक्रिया देऊ. ‘’
LIVE | Media interaction in Dharwad, #Karnataka#BJP #BJP4Karnataka #KarnatakaAssemblyElections#BJPWinningKarnataka #BJPYeBharavase #PoornaBahumata4BJP #DoubleEngineSarkara #KannadigasWithModi https://t.co/950F1Nqz8Y — Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) May 5, 2023
LIVE | Media interaction in Dharwad, #Karnataka#BJP #BJP4Karnataka #KarnatakaAssemblyElections#BJPWinningKarnataka #BJPYeBharavase #PoornaBahumata4BJP #DoubleEngineSarkara #KannadigasWithModi https://t.co/950F1Nqz8Y
— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) May 5, 2023
याचबरोबर उद्धव ठाकरे हे बारसू येथे जाणार आहेत, त्यांनी या प्रकल्पाला विरोध दर्शवलेला आहे. यावर प्रतिक्रिया देताना फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला, ‘’मी एवढच म्हणेण की उद्धव ठाकरेंचा विकास विरोधी चेहरा यामधून बाहेर आला आहे आणि त्यांना समाजाशी, विकासाशी काही घेणंदेणं नाही. निव्वळ राजकारण करायचं आहे, त्यासाठी विविध लोकांच्या खांद्यावर ते बंदूक ठेवत आहेत. आता बारसूच्या लोकांचा खांदा त्यांना मिळाला आहे.’’
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App