ITR : 1 ऑगस्टपासून होणार हे बदल ; ITR भरताना विलंब शुल्क, सिलिंडरचे दर वाढणार, वाचा सविस्तर…


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : ऑगस्ट महिना सुरू होण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. त्यामुळे नवीन महिना येताना आपल्याकडे नवीन बदल घेऊन येत असतो. याचा थेट परिणाम तुमच्या आयुष्यावर होणार आहे. त्यासाठी नियमांची माहिती तुमच्यापर्यंत अगोदरच ठेवणे गरजेचे आहे. विशेष करून चार महत्त्वाच्या निर्णयांमुळे मोठे बदल होऊ शकतात. यात प्रामुख्याने बँक ऑफ बडोदा 1 ऑगस्टपासून चेक पेमेंटचे नियम बदलणार आहे. 1 ऑगस्ट पासून आयटीआर भरण्यासाठी 5 हजार रुपये विलंब शुल्क भरावे लागेल. यासह अनेक गोष्टींचा या परिणाम प्रत्येकाच्या जीवनावर होणार आहे. These changes from August 1 Late fee while filing ITR, cylinder rates will increase, read more…

सकारात्मक वेतन प्रणाली लागू करणार

बँक ऑफ बडोदा 1 ऑगस्ट पासून चेक पेमेंट नियमांमध्ये काही बदल करणार आहे. बँकेने आपल्या ग्राहकांना सांगितले की, 1 ऑगस्टपासून 5 लाख रुपये किंवा त्याहून अधिक रकमेच्या धनादेशाच्या पेमेंटसाठी सकारात्मक वेतन प्रणाली अनिवार्य असणार आहे. चेक पेमेंट सुरक्षित करण्यासाठी आणि बँक फसवणूक टाळण्यासाठी हे बदल केले जात आहेत.



शेतकरी सन्मान निधीसाठी केवायसी गरजेचे

प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या केवायसीसाठी 31 जुलैची वेळही देण्यात आली आहे. अन्यथा पीएम योजनेच्या 12 व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळणार नाहीत. 1 ऑगस्टपासून शेतकरी केवायसी करू शकणार नाहीत. शेतकरी त्यांच्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरला (CSC) भेट देऊन त्यांचे e-kyc करून घेऊ शकतात. याशिवाय ऑनलाइन पीएम या शेतकऱ्याच्या अधिकृत वेबसाइटवरून घरी बसून e-kyc करून घेता येईल.

ITR भरण्यासाठी विलंब शुल्क द्यावा लागेल

करदात्यांनी 31 जुलैनंतर म्हणजेच 1 ऑगस्टपासून आयटीआर दाखल केल्यास त्यांना विलंब शुल्क भरावे लागेल. जर वैयक्तिक करदात्याचे वार्षिक उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल. तर त्याला 5000 रुपये विलंब शुल्क भरावे लागेल. जर करदात्याचे वार्षिक उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर त्याला विलंब शुल्क म्हणून 1,000 रूपये भरावे लागणार आहे.

गॅस सिलिंडर महागडे होण्याची शक्यता

एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतींचा दर महिन्याच्या 1 तारखेला आढावा घेतला जातो. अशा परिस्थितीत नैसर्गिक वायूच्या वाढत्या किमतींमुळे यावेळी घरगुती आणि व्यावसायिक अशा दोन्ही प्रकारच्या गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढू होणार आहे.

These Changes From August 1 Late Fee While Filing ITR, Cylinder Rates Will Increase, Read More…

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात