शाळा- रुग्णालय उभारणारा इतका स्वीट दहशतवादी जगात नसेल, अरविंद केजरीवाल यांचे दहशतवादाच्या आरोपावर उत्तर


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : शाळा-रुग्णालय उभारणारा इतका स्वीट दहशतवादी जगात नसेल, असे म्हणत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्यावरील दहशतवादाच्या आरोपांना उत्तर दिले आहे.There would not be such a sweet terrorist world building a school-hospital, Arvind Kejriwal responds to allegations of terrorism

विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत आम आदमी पक्षाचे (आप) माजी नेते आणि कवि कुमार विश्वास यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर ते फुटीरतावाद्यांचे समर्थक असल्याचा आरोप केल होता. केजरीवाल यांच्यावर झालेल्या आरोपावरून पंजाबमधील वातावरण तापले आहे.



ऐन निवडणुकीत हा गंभीर आरोप झाल्याने पंजाबमध्ये आता ‘आप’ला मोठा झटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण या आरोपांमुळे पंजाबच्या राजकारणाची दिशा बदलत असल्याची चर्चा आहे.

पण अरविंद केजरीवाल यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. ते म्हणाले, गेल्या १० वर्षांपासून केजरीवाल देशाचे विभाजन करण्याचा कट रचत आहेत. हे गेल्या दोन-चार दिवसांपासून लोकं बोलत आहेत. दोन तुकडे करून केजरीवालना त्यापैकी एकाचा पंतप्रधान व्हायचे आहे.

देशाचे दोन भाग असेच होतील का? हे लोक काय म्हणताहेत? हा माणूस १० वर्षांपासून कट रचत असल्याचे ते सांगत आहेत. मी दिल्लीचा मुख्यमंत्री आहे. मी १० वर्षांपासून कट रचतोय हे तुम्हाला माहीत होते, तर यातील ३ वर्षे काँग्रेसची होती. ७ वर्षे मोदीजींची आहेत.

मग त्यांची एजन्सी झोपली होती का? मी सर्वात मोठा दहशतवादी आहे, असे वाटते तर मग त्यांनी मला अटक का केली नाही? शाळा बांधणारा मी जगातील सर्वात स्वीट दहशतवादी असेन. हॉस्पिटल बांधतो. लोकांना तीर्थयात्रेला पाठवतो. असा दहशतवादी जगात जन्माला आला नसेल.

केंद्र सरकारने पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांना फोन केला आहे. आणि आपल्याविरोधात तक्रार करावी, असे सांगितले आहे. एका अधिकाऱ्याकडून मला ही बातमी मिळाली आहे. आता राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) विरोधात एक-दोन दिवसांत एफआयआर नोंदवेल. मी सर्व एफआयआरचे स्वागत करतो. पण केंद्र सरकार सुरक्षेबाबत असे वर्तन करत असेल तर हे चिंताजनक आहे, असा आरोप केजरीवाल यांनी केला.

कुमार विश्वास यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपानंतर केंद्र सरकार कुमार विश्वास यांच्या सुरक्षेचा आढावा घेणार आहे. आढावा घेतल्यानंतर आणि गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर सुरक्षा पुरवली जाईल, असे केंद्र सरकारमधील सूत्रांनी सांगितले.

There would not be such a sweet terrorist world building a school-hospital, Arvind Kejriwal responds to allegations of terrorism

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात