वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशात डिजिटल बँकिंगचे वारे वाहू लागले आहेत. कारण याबाबतचा प्रस्ताव नीती आयोगाने दिला आहे. त्यामुळे भारतातील युग हे डिजिटल बँकिंगचे असणार आहे. कारण अशा बँकांच्या कोठेही शाखा नसतील. सर्व व्यवहार हे ऑनलाइन होणार आहेत. The winds of digital banking will blow in the country, where we will not have a branch; All transactions online
सर्वसामान्य माणूस ज्या प्रमाणे बँकिंगचे व्यवहार करतो. त्या प्रमाणेच डिजिटल बँकिंगचे काम असणार आहे. पण,त्यांची कार्यालये कोठेही थाटली जाणार नाहीत. सर्व व्यवहार हे इंटरनेट किंवा अन्य ऑनलाइन प्लांटफॉर्मवेर केले जातील. लोकांना शाखेत जाऊन व्यवहार करावे लागणार नाहीत, हे डिजिटल बँकिंगचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. तसेच पैसे खात्यात भरणे, काढणे, कर्जप्रकरण करणे, या व आदी बाबी ऑनलाइन होणार आहेत.
यूपीआई (यूनिफाइड पेमेंट इंटरफेस) ने देशात डिजिटल क्रांती अगोदरच केली आहे. त्याचे फायदे दिसत आहेत. त्याद्वारे ४ लाख कोटींची उलाढाल झाली असून त्याचा लोकांना मोठा फायदा झाला आहे.
केंद्र सरकार डिजिटल चलन बाजारात आणण्याचा विचार करत आहे. क्रिप्टोकरन्सीला भारतात मान्यता नाही. त्याला पर्याय म्हणून संपूर्णतः भारतीय असलेले डिजिटल चलन आणण्याचा सरकार विचार करत आहे. हिवाळी अधिवेशनात त्यावर चर्चा होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App