आजादी का अमृत महोत्सव : स्वातंत्र्य योद्धांच्या संकल्पनेतील भारतीय ध्वजाचा अनोखा प्रवास!!


विनायक ढेरे

भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात सगळीकडे “हर घर तिरंगा” अभियान सुरू झाले आहे. भारतीय जनतेने त्याला प्रचंड उस्फूर्त प्रतिसाद दिला आहे. कोट्यावधी घरांच्या शिखरावर तिरंगे स्वाभिमानाने फडकत आहेत. The unique journey of the Indian flag in the concept of freedom fighters

पण भारतीय स्वातंत्र्याचे आणि अभिमानाचे प्रतीक ठरलेला आजचा तिरंगा ध्वज हा 15 ऑगस्ट 1947 रोजी फडकवलेला आहे. त्याआधी देखील भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात भारतीय ध्वजाचा वेगवेगळ्या रूपात प्रवास घडला आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अग्रेसर असणाऱ्या अनेक धुरिणांनी या ध्वजाला आपापल्या संकल्पनेतील आकार देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी अनेकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भगवा ध्वजापासून प्रेरणा घेऊन आपापले संकल्पनेतील ध्वज तयार केले होते.

 

 

यामध्ये 1857 च्या स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणींनी तयार केलेला कमळ सुवर्ण मुद्रांकित ध्वज, कलकत्त्यातला वंदे मातरम ध्वज, लोकमान्य टिळक, ऍनी बेझंट यांच्या होमरूल लीगचा ध्वज, स्वातंत्र्यवीर सावरकर, मॅडम भिकाजी कामा आणि हेमचंद्र दास यांनी तयार केलेला आठ कमळांचा वंदे मातरम सूर्य, चंद्र चिन्हांकित ध्वज, महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य चळवळीत अग्रेसर असलेली काँग्रेस यांचे ध्वज तसेच आझाद हिंद फौजेचा वाघ झेपावणारा ध्वज आणि आजचा तिरंगा असा हा प्रवास आहे.

आजचा तिरंगा हा ध्वज प्रथम पिंगली व्यंकय्या यांनी तयार केलेला आहे. भगवा, पांढरा त्यावर अंकित अशोक चक्र अथवा सुदर्शन चक्र आणि खाली हिरवा रंग हा सध्याच्या भारतीय प्रजासत्ताकाने स्वीकारलेला ध्वज आहे..

The unique journey of the Indian flag in the concept of freedom fighters

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती