जम्मू-काश्मीर : लाल चौकातील प्रेस एन्क्लेव्हवर फडकला तिरंगा


  • प्रेस एन्क्लेव्ह या इमारतीवर देशाच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच तिरंगा ध्वज फडकला आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी ही माहिती दिली.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर तिथली परिस्थिती हळूहळू बदलत असल्याचं पाहायला मिळतंय.

विशेष प्रतिनिधी 

श्रीनगर : जम्मू-काश्मीर मधील लाल चौकातील प्रेस एन्क्लेव्ह येथे पहिल्यांदाच तिरंगा फडकला आहे. या इमारतीवर देशाच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच तिरंगा ध्वज फडकला आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी ही माहिती दिली आहे. सिंह यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन प्रेस एन्क्लेव्हवर डौलाने फडकणाऱ्या तिरंग्याचे फोटोही शेअर केले आहेत. The tricolor flag was hoisted on the Press Enclave building at Lal Chowk

 

श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकावण्यावरुन अनेकदा वाद झाला आहे . ही परिस्थितीत अनेक वर्षे कायम होती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर तिथली परिस्थिती हळूहळू बदलत असल्याचं पाहायला मिळतंय.

जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवाया कमी होत आहेत. अशावेळी लाल चौकातील प्रेस एन्क्लेव्ह इमारतीवर तिरंगा फडकल्यानं देशप्रेमी नागरिकांकडून आनंदाची भावना व्यक्त केली जात आहे.

The tricolor flag was hoisted on the Press Enclave building at Lal Chowk

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात