डाव्या सरकारचा शपथविधी ५०० जणांच्या हजेरीत २० तारखेला केरळात; जनता होरपळतीय कोविड आणि चक्रीवादळाच्या प्रकोपात


वृत्तसंस्था

तिरूअनंतपूरम – कोविडचा फैलाव आणि चक्रीवादळ यांच्या प्रकोपाशी केरळची जनता झुंजत असताना राज्यातील सत्ताधारी डाव्या आघाडीला आपल्या नव्या सरकारचा शपथविधी सोहळा साधेपणाने नव्हे, तर सार्वजनिक पातळीवर साजरा करणे अधिक महत्त्वाचे वाटत आहे. The swearing-in ceremony of the new LDF govt will take place on May 20th at 3:30 pm in central stadium

देशात सगळीकडे सामान्य नागरिकांच्या धार्मिक आणि सार्वजनिक कार्यक्रमांवर कठोर निर्बंध लावले असताना केरळमध्ये येत्या २० तारखेला पिनरई विजयन सरकारचा शपथविधी सेंट्रल स्टेडियममध्ये करण्याचा घाट घालण्यात आला आहे. यासाठी कोविड मर्यादा म्हणून “फक्त ५०० जणांनाच” शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आल्याची मखलाशी देखील पिनरई विजयन यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.



सर्वसामान्यांच्या विवाह सोहळ्यास किंवा अन्य धार्मिक, सामाजिक सोहळ्यास फक्त ५० जणांच्या उपस्थितीचे बंधन देशात घालण्यात आले आहे. याला केरळच्या डाव्या आघाडीने मात्र स्वतःपुरता अपवाद केला आहे. २० तारखेला दुपारी ३.३० वाजता राज्यपाल अरिफ महंमद खान यांच्या उपस्थितीत पिनरई विजयन सेंट्रल स्टेडियममध्ये ५०० जणांच्या उपस्थितीत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. त्याचवेळी काही मंत्र्यांनाही पद आणि गोपनीयतेची शपथ दिली जाईल. दस्तुरखुद्द पिनरई विजयन यांनीच पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. एकीकडे केरळची जनता कोविडशी झुंजते आहे. दुसरीकडे चक्रीवादळानेही थैमान घातले आहे आणि डाव्या आघाडीचे नेते नव्या सरकारच्या सार्वजनिक शपथविधी सोहळ्याची तयारी करीत आहेत.

The swearing-in ceremony of the new LDF govt will take place on May 20th at 3:30 pm in central stadium

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात