‘’भारताने केवळ वाघांना वाचवले नाही, तर त्यांची संख्या वाढण्यासाठी अनुकूल पर्यावरणही निर्माण केले आहे.’’ असेही मोदींनी सांगितले.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी देशातील वाघांची सध्याची आकडेवारी जाहीर केली. त्यांनी सांगितले की, २०२२ पर्यंत भारतात वाघांची संख्या ३ हजार १६७ इतकी नोंदवली गेली आहे. त्यांनी म्हैसूरमध्ये ‘इंटरनॅशनल बिग कॅट्स अलायन्स’चे उद्घाटनरू केले. यादरम्यान, कार्यक्रमात उपस्थित लोकांना संबोधित करताना ते म्हणाले की, ‘’भारताने केवळ वाघांना वाचवले नाही, तर त्यांची संख्या वाढण्यासाठी अनुकूल पर्यावरण निर्माण केले आहे.’’ The success of Project Tiger is not only for India but also for the whole world to be proud of PM Modi
‘प्रोजेक्ट टायगर’चे यश केवळ भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी अभिमानास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, आम्ही पर्यावरण आणि अर्थव्यवस्था यांच्यातील संघर्षावर विश्वास ठेवत नाही; आम्ही त्यांच्या सहजीवनाला महत्त्व देतो. भारत असा देश आहे जिथे निसर्गाचे रक्षण करणे हा संस्कृतीचा भाग आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, अनेक व्याघ्र प्रकल्प असलेल्या देशांमध्ये त्यांची संख्या स्थिर आहे किंवा कमी होत आहे, तर भारतात ती वेगाने का वाढत आहे? याचे उत्तर आहे भारताची परंपरा, भारताची संस्कृती आणि भारतीय समाजातील जैवविविधता, पर्यावरणाविषयीचा आपला नैसर्गिक आग्रह. आशियाई सिंह असलेला आपण जगातील एकमेव देश आहोत. सिंहांची लोकसंख्या २०१५ मध्ये ५२५ वरून २०२० मध्ये ६७५ पर्यंत वाढली आहे. याशिवाय बिबट्याची संख्या अवघ्या चार वर्षांत ६० टक्क्यांपेक्षा जास्त वाढली आहे.
The number of big cats is rebounding! The positive results of India's wildlife conservation efforts… pic.twitter.com/jinD8gFGqB — BJP (@BJP4India) April 9, 2023
The number of big cats is rebounding!
The positive results of India's wildlife conservation efforts… pic.twitter.com/jinD8gFGqB
— BJP (@BJP4India) April 9, 2023
भारतात २०१४ मध्ये २ हजार २२६ वाघ होते, ज्यामध्ये ४२ टक्के वाढ होऊन ही संख्या २०२२ पर्यंत ३ हजार १६७ वर पोहचली आहे. तसेच, २०१४ मध्ये सिंहांची संख्या ५२३ होती ज्यात २९ टक्के वाढ होऊन ही संख्या २०२० मध्ये ६७४ वर पोहचली होती. याशिवाय बिबट्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. २०१४ मध्ये देशात ७ हजार ९१० बिबटे होते ज्यामध्ये तब्बल ६३ टक्के वाढ होऊन ही संख्या २०१८ पर्यंत १२ हजार ८५२ वर पोहचली होती.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App