सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया एप्रिलच्या तुलनेत लसीचे उत्पादन दुप्पट करणार

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : जगातील सर्वांत मोठी लस उत्पादक कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आता कोरोना प्रतिबंधक लसीच्या सुमारे 150 दशलक्ष मात्रा उत्पादित करणार आहे. हे उत्पादन एप्रिलमध्ये सुमारे 65 दशलक्ष होते.The Serum Institute of India will double the production of the vaccine as compared to April

देशात कोरोना लसीकरणाचा वेग झपाट्याने वाढत आहे. करोनाविरुद्धच्या लढाईत लसीकरण हे सर्वांत महत्वाचे शस्त्र आहे. अशा परिस्थितीत, देशात लसीचा तुटवडा दूर करण्यासाठी सरकारने लसीचे उत्पादन सातत्याने वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.



त्यामुळे भारताचे कोरोना प्रतिबंधक लसींचे वाढते उत्पादन आणि अध्यार्हून अधिक प्रौढ लोकसंह्ययेला कमीतकमी एक मात्रा देऊन झाल्याने पुढील वर्षाच्या सुरुवातीपासून काही महिन्यांत देशातून पुन्हा निर्यात होऊ शकते अशी आशा करण्यात येत आहे.

भारताच्या दैनंदिन लसीकरणाने शुकह्यवारी 10 दशलक्ष मात्रांचा टप्पा ओलांडला आहे, जो एप्रिलपासूनच्या लसींच्या उत्पादनापेक्षा दुप्पट आहे. येत्या आठवड्यात तो पुन्हा वाढणार आहे. कॅडिला हेल्थकेअर द्वारे विकसित केलेल्या लसीला नुकतीच मान्यता मिळाली आहे आणि रशियाच्या स्पुटनिक व्हीचे व्यावसायिक उत्पादन भारतात सुरू होत आहे.

त्यामुळे नवीन उत्पादन तयार होणार आहे. दरम्यान, गुजरातच्या भरूच जिल्ह्यातील अंकलेश्वर येथील भारत बायोटेकच्या नवीन प्रकल्पात कोव्हॅक्सिन लसीचे उत्पादन सुरू केले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी या प्रकल्पाचे उद्घाटन केले.

The Serum Institute of India will double the production of the vaccine as compared to April

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात