आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती म्हणून गौतम अदाणी यांनी आपले नाव कोरले आहे अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी हे तब्बल ८८.५ अब्ज डॉलर्स ( भारतीय चलनात ६,६३,७५० कोटी) इतक्या प्रचंड संपत्तीसह आशियातील सर्वाधिक श्रीमंत होण्याचा बहुमान मिळवला आहे. मागील अनेक वर्ष या पदावर निर्विवाद वर्चस्व असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना गौतम अदानी यांनी मात दिली आहे. The richest man in Asia is now Gautam Adani
विशेष प्रतिनिधी
मुंबई – आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती म्हणून गौतम अदाणी यांनी आपले नाव कोरले आहे अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी हे तब्बल ८८.५ अब्ज डॉलर्स ( भारतीय चलनात ६,६३,७५० कोटी) इतक्या प्रचंड संपत्तीसह आशियातील सर्वाधिक श्रीमंत होण्याचा बहुमान मिळवला आहे. मागील अनेक वर्ष या पदावर निर्विवाद वर्चस्व असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना गौतम अदानी यांनी मात दिली आहे.The richest man in Asia is now Gautam Adani
गौतम अदानी यांची संपत्ती मंगळवारी ८८.५ बिलियन डॉलर्स इतकी झाल्याचं ब्लुमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सने म्हटले आहे. मुकेश अंबानींची एकून संपत्ती ही ८७.९ बिलीयन डॉलर्स इतकी आहे. अदानींच्या खासगी संपत्तीमध्ये १२ बिलीयन डॉलर्सची वाढ झाली आहे. त्यामुळे या वर्षांत सर्वाधिक संपत्ती वाढलेले अदानी हे श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.
गेल्या दोन वर्षांमध्ये अदानी समूहाच्या शेअर्सची किंमत ६०० टक्क्यांनी वाढली आहे. अदानी समूह २०७० मध्ये भारताचं झीरो कार्बन उद्दीष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने हरित ऊर्जेला प्राधान्य देत आहे.
गौतम अदानी यांच्या संपत्तीत मागील एक वर्षात तब्बल ९० हजार कोटी अर्थात १२ अब्ज डॉलर्सची प्रचंड वाढ झाली आहे. अदानी समूह कोळसा, ऊर्जा, नैसर्गिक वायू, एफएमसीजी , पोर्ट या उद्योगांमध्ये आहे. अदानी समूहातील काही शेअरने मागील एक वर्षात गुंतवणूकदारांना तब्बल ६०० टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App