कोरोनाविरुद्धच्या युद्धाची जबाबदारी नितीन गडकरींकडे सोपवावी ; भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांची मागणी


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : देशात कोरोनाने हाहाकार माजविला आहे. ही परिस्थिती आटोक्यात आणण्याचे काम केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सोपवावी, अशी आग्रही मागणी भाजपचे राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. The responsibility for the war against Corona should be handed over to Nitin Gadkari

सध्याचे आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन अतिशय नम्र स्वभावाचे आहेत. त्यांना त्यांच्या खात्यात मोकळेपणाने कार्य करता येत नाही, मात्र अधिकार वाणीने बोलणाऱ्या नेत्यांसारखे ते नसून खूपच नम्र आहेत. गडकरींच्या सोबत काम केल्याने त्यांच्यातील हा गुण नक्कीच बहरेल,” अशी अपेक्षा स्वामींनी व्यक्त केले. मी पंतप्रधान कार्यालयासंदर्भात भाष्य केलं असून तो एक विभाग आहे. पंतप्रधान कार्यालय म्हणजे पंतप्रधान नाहीत हे लक्षात घ्यावं, असंही स्वामींनी ट्विमध्ये म्हटलं आहे.



“ज्याप्रमाणे भारत इस्लामिक आक्रमणं आणि ब्रिटीश साम्राज्यवाद्यांनंतरही टिकून राहिला. त्याचप्रमाणे आपण कोरोनाच्या साथीचा सामना करुन नक्कीच टीकू. आता आपण नीट काळजी घेतली नाही, योग्य निर्बंध लावले नाहीत तर मुलांवर परिणाम करणारी आणखीन एक लाट आपल्याकडे येईल. म्हणून मोदींनी या कोरोनाविरुद्धच्या युद्धाची जबाबदारी गडकरींकडे सोपवावी. पंतप्रधान कार्यालयावर अवलंबून राहणे फायद्याचं ठरणार नाही,” असं स्वामी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

The responsibility for the war against Corona should be handed over to Nitin Gadkari

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात