
विशेष प्रतिनिधी
कोलकत्ता : कॅन्सर या आजाराचं नाव ऐकलं की गरीब आणि मध्यमवर्गीय हिंमत हरायला लागतात. गरीबांना याच वाईट चक्रातून, चिंतेतून बाहेर काढण्यासाठी देश स्वस्त उपचारासाठी पावले उचलत आहे. मागील काही वर्षात कॅन्सरच्या उपचारासाठी औषधांच्या किमतीत मोठी कपात करण्यात आली.The Prime Minister said that the poor, the middle class would lose heart if they heard the name ‘Cancer’, Lower drug prices for them
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये चित्तरंजन राष्ट्रीय कर्करोग संस्थेच्या कॅम्पसचं व्हर्च्युअली उद्घाटन केले. यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले, आयुष्मान भारत योजना आज उपचाराच्या बाबतीत जागतिक संकेत बनलीय. ढट-खअ अंतर्गत देशात २ कोटी ६० लाखपेक्षा अधिक रूग्ण मोफत उपचार घेत आहेत.
देशाने नव्या वषार्ची सुरुवात १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणापासून केली होती. त्याप्रमाणे नव्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात पहिल्याच आठवड्यात भारत १५० कोटी म्हणजेच १.५ बिलियन लसीकरणाचा ऐतिहासिक टप्पा पार करत आहे. आज भारताच्या वयस्क लोकसंख्येपैकी ९० टक्क्यांपेक्षा जास्त लोकांना लसीचा एक डोस मिळाला आहे.
केवळ ५ दिवसांमध्ये दीड कोटी मुलांचं लसीकरण केलं आहे. हे यश संपूर्ण देशाचं आणि प्रत्येक सरकारचं आहे. मी या यशासाठी विशेष करून देशातील संशोधक, लस निर्माते, आरोग्य कर्मचारी यांचे आभार मानतो. सर्वांच्या प्रयत्नांमुळेच देश या संकल्पाच्या शिखरावर पोहचला आहे. याची सुरुवात आपण शून्यापासून केली होती.
केंद्र सरकारने आतापर्यंत पश्चिम बंगालला ११ कोटी करोना लसीचे डोस मोफत दिले असल्याचे सांगून बंगालला दीड हजारपेक्षा अधिक व्हेंटिलेटर, ९ हजारहून अधिक नवे ऑक्सिजन सिलिंडर दिले आहेत. ४९ नवे आॅक्सिजन प्लँट्स देखील सुरू झाले आहेत.
२०१४ पर्यंत देशात वैद्यकीय अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट जागांची संख्या ९० हजारच्या जवळपास होती. मागील ७ वर्षांमध्ये यात ६० हजार नव्या जागांची भर पडली आहे. २०१४ मध्ये आपल्याकडे केवळ ६ एम्स होते. आज देश २२ एम्सच्या सशक्त नेटवर्ककडे वाटचाल करत आहे.
The Prime Minister said that the poor, the middle class would lose heart if they heard the name ‘Cancer’, Lower drug prices for them
महत्त्वाच्या बातम्या
- पंतप्रधानांचा दौरा, सुरक्षिततेतील हलगर्जीपणा आणि सतलजच्या पात्रातील पाकिस्तानी होडीचे रहस्य
- पंतप्रधानांना मृत्यूच्या विहिरीत ढकलण्याचा योगायोगा नव्हता, ड्रोन किंवा टेलिस्कोपिक गनने केली असती हत्या, केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांचा संशय
- जगभरात अवघ्या २४ तासांत २५ लाख जणांना कोरोनाची लागण
- पाच राज्यांत निवडणुका घेण्यासाठी एकमेव सुरक्षित मार्ग म्हणजे ८० टक्के लसीकरण, प्रशांत किशोर यांचा निवडणूक आयोगाला सल्ला
- अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर बायडेन पुन्हा बरसले
Array