विशेष प्रतिनिधी
कानपूर : नवऱ्याने तलाक दिल्यामुळे निराधार झालेल्या महिलांना सरकारी योजनेतून स्वावलंबी होण्याची संधी मिळाली. तलाक झालेल्या या महिलांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कानपूर दौऱ्यात संवाद साधला. त्यांना स्वावलंबी होण्याचा मंत्र सांगितला. तुमच्या मुलींना शिकवा. त्यानंतर त्या पूर्णपणे स्वावलंबी होतील असा कानमंत्र मोदी यांनी दिला.The Prime Minister interacted with divorced women and gave them the mantra of becoming self-reliant
कानपूरमधील फरझाना या महिलेशी मोदींनी संवाद साधला. त्यांना नवऱ्याने चार वर्षांपूर्वी ट्रिपल तलाक दिला होता. फरझाना आता खाद्यपदाथार्चा उद्योग चालवतात. पंतप्रधान स्वनिधी योजनेच्या अंतर्गत यांना टाळेबंदी असतानाही या उद्योगासाठी कर्ज मिळाले होते.
पंतप्रधान मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबरोबर छायाचित्र काढण्याची इच्छा फरझाना यांनी व्यक्त केली. त्यांना हे छायाचित्र त्यांच्या दुकानात ठेवायचा आहे. मोदींनी तत्काळ ती इच्छा मान्य केली. पंतप्रधानांनी आठवडाभरापूर्वीच प्रयागराजमध्ये शबाना परवीन आणि त्यांच्या नऊ महिन्यांच्या मुलीशी संवाद साधला होता.
परवीन यांनी बँक कर्मचारी म्हणून केलेल्या कामाबद्दल पंतप्रधानांनी त्यांच्याशी चर्चा केली होती.सरकारी योजनेचा लाभ झालेल्या 25 लाभार्थ्यांपैकी फरझाना एक आहे. मी दोन मुलींना तुमच्यामुळे शिक्षण देऊ शकते.
माझ्या मुलींनी चांगले शिक्षण घ्यावे, ही माझी इच्छा आहे. मी खूप वाईट दिवस सहन केले आहेत. चार वर्षांपूर्वी नवऱ्याने मला तलाक दिला आणि दोन लहान मुलींसह मला त्याचे घर सोडावे लागले. माझ्या मुलींना घर नाही, अशी व्यथा त्यांनी पंतप्रधानांजवळ व्यक्त केली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App