भारतापुढची कोविड १९ आव्हाने; टेस्टिंग वाढविले; होम आयसोलेशन सुविधांवर भर; देशाचा कोरोना पॉझिटिव्ह रेट २१%; आयसीएमआरची माहिती


वृत्तसंस्था

नवी दिल्ली – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशापुढे नवी आव्हाने उभी केली आहेत. त्याचा मुकाबला करण्यासाठी टेस्टिंग वाढविण्याबरोबरीने होम आयसोलेशनसारख्या सुविधांवर भर देण्यात आला आहे, अशी माहिती आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. The national positivity rate is around 21%: ICMR DG Dr. Balram Bhargava

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशापुढे निर्माण केलेल्या नवीन आव्हानांचा आढावा आणि त्यावरच्या उपाययोजना यांची सविस्तर माहिती डॉ. भार्गव यांनी दिली. ते म्हणाले, ३० एप्रिल २०२१ रोजी भारताने कोरोना चाचणीचा जगातला विक्रम नोंदविला आहे. या दिवशी १९,४५,२९९ कोरोना चाचण्या देशभरात करण्यात आल्या. सध्या देशाचा कोरोना पॉझिटिव्ह रेट २१ टक्के एवढा आहे. हा रेट कमी करण्यासाठी देशभर शहरांमध्ये, गावांमध्ये रॅपिड अँटीजेन टेस्ट अर्थात आरएटी टेस्ट केंद्रे उभारण्यात येत आहेत.

सर्व सरकारी आणि खासगी रूग्णालयांमध्ये आरएटी टेस्टला परवानगी देण्यात आली आहे. शाळा, महाविद्यालयांमध्ये आरएटी टेस्ट केंद्रे उघडण्यात येत आहेत. त्यासाठी संबंधित केंद्रांना अधिमान्यतेची अनिवार्यता ठेवलेली नाही. आएटी आणि आरटीपीसीआर टेस्टचे रिपोर्ट्स मात्र आयसीएमआरच्या पोर्टलवर अपलोड करणे अनिवार्य करण्यात आले आहे. यापुढे जाऊन घरी जाऊन आरएटी टेस्ट करता येतील का, तशी मोहीम देशव्यापी घेता येईल का, याचा विचार सुरू आहे, अशी माहिती देखील डॉ. बलराम भार्गव यांनी दिली आहे.



देशातील ७३४ जिल्ह्यांपैकी ३१० जिल्ह्यांमध्ये कोरोना पॉझिटिव्हीटी रेट अधिक आहे. तेथे आरएटी टेस्ट वाढविण्याबरोबरीने होम आयसोलेशनच्या सुविधा वाढविण्यावर भर देण्यात आला आहे. दररोज सुमारे १७ लाख आरएटी टेस्ट करण्यात येत आहेत, तर १६ लाख आरटीपीसीआर टेस्ट करण्यात येत आहेत. देशातील सर्व प्रयोगशाळा २४ तास सुरू आहेत. तिथेही कोरोना संसर्गाचा धोका असूनही पर्यायी व्यवस्था करून प्रयोगशाळा सुरू ठेवण्यास प्राधान्य देण्यात येत आहे, असे डॉ. भार्गव यांनी स्पष्ट केले आहे.

The national positivity rate is around 21%: ICMR DG Dr. Balram Bhargava

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात