अखेरचा सलाम : सीडीएस रावत यांच्यासह सर्व शहीद जवानांचे पार्थिव दिल्लीतील पालम विमानतळावर आणले, रात्री ९ वाजता पीएम मोदी वाहणार श्रद्धांजली

The mortal remains of all the martyrs including General Rawat were brought to Palam Airport in Delhi, PM will pay tribute at 9 pm

General Rawat : तामिळनाडू हेलिकॉप्टर अपघातात शहीद झालेले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका यांच्यासह १३ जवानांचे मृतदेह गुरुवारी रात्री ८.४५ वाजता दिल्लीच्या पालम विमानतळावर आणण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल रात्री 9 वाजता विमानतळावर सर्व शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करतील. डोवाल साडेआठ वाजता विमानतळावर पोहोचले. ते येथे शहीद जवानांच्या कुटुंबीयांची भेट घेत आहेत. The mortal remains of all the martyrs including General Rawat were brought to Palam Airport in Delhi, PM will pay tribute at 9 pm


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : तामिळनाडू हेलिकॉप्टर अपघातात शहीद झालेले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका यांच्यासह १३ जवानांचे मृतदेह गुरुवारी रात्री ८.४५ वाजता दिल्लीच्या पालम विमानतळावर आणण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल रात्री 9 वाजता विमानतळावर सर्व शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करतील. डोवाल साडेआठ वाजता विमानतळावर पोहोचले. ते येथे शहीद जवानांच्या कुटुंबीयांची भेट घेत आहेत.

तत्पूर्वी, डॉक्टरांच्या पथकाने रावत, मधुलिका आणि ब्रिगेडियर एलएस लिडर यांच्यासह चार मृतदेहांची ओळख पटवली. रावत आणि मधुलिका यांच्या पार्थिवावर शुक्रवारी दिल्लीतच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

कुटुंबीयांनी वाहिली श्रद्धांजली

सीडीएस रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत आणि इतर 11 जणांचे पार्थिव पालम एअरबेसवर ठेवण्यात आले होते, तेथे त्यांच्या कुटुंबीयांनी श्रद्धांजली वाहिली.

कोण केव्हा वाहणार श्रद्धांजली?

पार्थिव पालम विमानतळावर पोहोचल्यानंतर त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. संरक्षण सचिव 08.30 वाजता, एअर चीफ मार्शल 08.33 वाजता, नौदल प्रमुख- 08.36, लष्कर प्रमुख- 08.39, संरक्षण राज्यमंत्री- 08.42, एनएसए डोवाल 08.45 वाजता, संरक्षण मंत्री- 08.50 वाजता, पंतप्रधान- 09.05 वाजता, तर राष्ट्रपती- 09.15 वाजता श्रद्धांजली अर्पण करतील.

उद्या दिल्लीत अंत्ययात्रा

जनरल बिपिन रावत यांचे पार्थिव आज दिल्लीत त्यांच्या घरी पोहोचणार आहे. शुक्रवारी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत लोक रावत यांच्या दिल्लीतील घरी त्यांचे अंत्यदर्शन घेतील. यानंतर कामराज मार्ग ते बेरार चौकापर्यंत अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे व नंतर दिल्ली कॅन्टोन्मेंटमध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत.

मृतदेहांची ओळख पटवणे खूप कठीण

संरक्षण मंत्रालयाने गुरुवारी दुपारी एक निवेदन जारी केले होते. मंत्रालयाने सांगितले की, हा अपघात इतका भीषण होता की मृतदेहांची ओळख पटवणे कठीण झाले आहे. जवळच्या व्यक्तीच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत यासाठी आम्ही योग्य ती सर्व पावले उचलत आहोत. मृतांच्या नातेवाइकांना दिल्लीला बोलावण्यात आले आहे. याशिवाय सायंटिफिक पद्धतीनेही तपास केला जाणार आहे.

The mortal remains of all the martyrs including General Rawat were brought to Palam Airport in Delhi, PM will pay tribute at 9 pm

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    अभूतपूर्व गर्दी अन् अविस्मरणीय महाराष्ट्र भूषण सोहळा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काही निवडक ग्रंथसंपदा… ‘’टायगर…’’ बस्स नाम ही काफी है!