काका महापौर असल्याने रायपूरमध्ये एका तरुणाने मास्क घातला नाही म्हणून अडविल्यावर पोलीसांशीच हुज्जत घातल्याचा प्रकार घडला. पोलीसांनी आपली माफी मागावी असे म्हणत या तरुणाने गोंधळ घातला. या प्रकरणी शेवटी महापौरांनाच माफी मागावी लागली.The mayor’s nephew opposed the action as he did not wear a mask
विशेष प्रतिनिधी
रायपूर : काका महापौर असल्याने रायपूरमध्ये एका तरुणाने मास्क घातला नाही म्हणून अडविल्यावर पोलीसांशीच हुज्जत घातल्याचा प्रकार घडला. पोलीसांनी आपली माफी मागावी असे म्हणत या तरुणाने गोंधळ घातला. या प्रकरणी शेवटी महापौरांनाच माफी मागावी लागली.
यापूरचे महापैर ऐजाज ढेबर यांचा पुतण्या शोएब ढेबर स्कुटरवरून चालला होता. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्याने अगोदर मास्क घातलेला नव्हता. पोलीसांना पाहिल्यावर मास्क घालू लागला. त्यामुळे पोलीसांनी त्याला विचारणा केली.
यावर शोएबने पोलीसांशीच हुज्जत घालायला सुरूवात केली. मोबाईलवरून कोणालाही फोन करून पोलीसांवर दबाब आणण्यास सुरूवात केली. मात्र, पोलीसांनी त्याला हिसका दाखविलाच आणि त्याच्याकडून पाचशे रुपये दंड वसूल केला.
याबाबत महापौर शोएब ढेबर म्हणाले, कायदा हा सर्वांसाठी समान आहे. मग तो पंतप्रधानांचा नातेवाईक असो की माझा. माझ्या पुतण्याने केलेल्या चुकीचा दंड त्याने भरला आहे. त्याला इशारा दिला आहे की
अशा प्रकारची चूक त्याने पुन्हा करू नये. संकटाच्या या परिस्थितीत आपल्या कोरोना वॉरिअर्सला सहकार्य करायला हवे. त्यांचा सन्मान करायला हवा.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App