विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : चीनचे अनियंत्रित झालेले बाहुबली रॉकेट पृथ्वीच्या कक्षेत येत असताना नष्ट झाले असून त्याचा मोठा भाग रविवारी (ता. 9) सकाळी हिंद महासागरात पडला आहे. त्यामुळे सुमारे 20 टन रॉकेट मानवी वस्तीवर पडून जीवितहानी होण्याचा धोका आता टळला आहे. दरम्यान, मालदीव बेटाजवळ त्याचे अवशेष आढळून आले आहे. The Long March 5B :China’s Bahubali rocket finally crashed into the Indian Ocean; Avoided the risk of death
चीनचे The Long March 5B या नावाचे अवाढव्य आकाराचे रॉकेट अनियंत्रित झाले होते. 30 मीटर उंचीचे आणि 20 हजार किलोचे हे रॉकेट होते.
चीनने अवाढव्य अवकाश स्थानक उभारण्याचा महत्वकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. Tiangong-3, असे अवकाश स्थानकाचे नाव आहे. Tiangong चा अर्थ अवकाशातील राजवाडा , असा आहे. त्याच्या उभारणीसाठी या रॉकेटचा वापर चीनने केला. या रॉकेटमधून स्थानकाच्या मध्यभगाच्या संगाड्याची वाहतूक केली. सांगडा अवकाश स्थानकापर्यंत पोचविल्यानंतर रॉकेट परतू लागले. पण, त्याच्यावरील नियंत्रण सुटले. ते वेगाने पृथ्वीच्या घिरट्या घालू लागले. एक क्षण असा आला की, रॉकेट पृथ्वीच्या कक्षेत शिरले आणि गुरुत्वाकर्षणाने पृथ्वीकडे खेचले गेले.
अमेरिकेची नास आणि चिनी वैज्ञानिक रॉकेटवर लक्ष ठेऊन होते. ते केव्हाही आणि कोठेही पृथ्वीवर या आठवड्यात कोसळेल, असा इशारा दिला होता. प्रामुख्याने पृथ्वीच्या उत्तर गोलार्थात पडेल, असा अंदाज वर्तविला होता. परंतु, सर्व अंदाज साफ चुकले असून ते हिंद महासागरात कोसळले आहे. अर्थात पृथ्वीच्या कक्षेत येताच त्याचा बहुतांश भाग हा वातावरणाच्या संपर्कात आल्यामुळे नष्ट झाला असून मोठा भाग हा हिंद महासागरात कोसळला आहे.
रॉकेट दृष्टीक्षेपात
नाव : The Long March 5B
लांबी : 30 मीटर
वजन : 20 हजार किलो
कशासाठी निर्मिती : चीनचे अवकाश स्थानक Tiangong-3 च्या माध्यभागाच्या सांगाड्याच्या वाहतुकीसाठी वापर
उड्डाण केव्हा केले : 29 एप्रिल 2021 रोजी हैनांन प्रांतातील वेनचँग अवकाश केंद्रावरून प्रक्षेपण
काय झाले : हे रॉकेट अनियंत्रित झाले आहे. त्यामुळे ते या आठवड्यात केव्हाही आणि कोठेही कोसळण्याचा धोका आहे.
पडले कुठे : हिंद महासागरात 9 मे 2021 रोजी
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App