विशेष प्रतिनिधी
मुंबई : ‘द काश्मीर फाईल्स’ सर्वच स्तरातून या सिनेमावर भाष्य केलं जातंय. राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम करणारी मंडळी असो, किंवा अन्य कुणी… सगळेच जण याविषयी बोलताना दिसताय.आता इतक्या दिवस गप्प असलेले बॉलिवूडमधली मंडळीही यावर बोलत आहेत. नवाजुद्दीन सिद्दीकी यांनीही’द काश्मीर फाईल्स’ या सिनेमावर भाष्य केलंय. “विवेक अग्नीहोत्री यांच्या हिमतीची दाद द्यायला हवी, त्यांनी हा वेगळा विषय हाताळला. असेच वेगळ्या धाटणीचे सिनेमे यायला हवेत”, असं नवाजुद्दीन म्हणाले आहेत. THE KASHMIR FILES: Appreciate Vivek Agnihotri’s courage! I want more movies like The Kashmir Files – I would love to do a role: Nawazuddin Siddiqui ..
हॉलिवूडमध्ये जास्तीत जास्त भारतीय कलाकारांनी काम करायला हवं असं तुम्हाला वाटतं का? यावर बोलताना त्यांनी काश्मिर फाईल्स चे उदाहरण दिले .
“सतत आपण त्या सिनेमांमध्ये काम करावं, अशी आशा का बाळगायची? त्यापेक्षा आपण चांगले सिनेमे करूयात जे तिकडं पाहिले जातील. त्यासाठी हिमतीची गरज आहे, जशी आता विवेक अग्निहोत्री यांनी ‘द काश्मीर फाईल्स’च्या माध्यमातून दाखवली. तसे आणखी सिनेमे तयार व्हायला हवेत”. मी अश्या सिनेमांमध्ये काम जरूर करू इच्छितो” असंही नवाज म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App