वृत्तसंस्था
फरिदाबाद : हरियाणाच्या ओल्ड फरिदाबाद रेल्वे स्टेशनवर एक मालगाडी थेट भिंत तोडून पार्किंगमध्ये घुसली. अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले. The goods train lost control and entered the parking area at the railway station at haryana
मालगाडी भिंत तोडून पार्किंगमध्ये घुसल्याने रेल्वे स्टेशन परिसरात खळबळ माजली. एका रेल्वे कर्मचाऱ्याचा जीव सुदैवाने थोडक्यात बचावला. रेल्वे निरीक्षक एके गोयल यांनी सांगितले की, सोमवारी संध्याकाळी ही घटना घडली. ट्रेनच्या मागे उभा असलेला रेल्वे कर्मचारी नशीब बलवत्तर म्हणून सुखरुप बचावला. पण, रेल्वे अपघातानं सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकवला.
रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, सिमेंटची भरलेली पोती घेऊन मालगाडी गंगापूरहून ओल्ड फरिदाबाद स्टेशनला पोहचली. ट्रेन माल उतरवण्यासाठी मागील बाजूस जात होती. तेव्हा रेल्वे यार्डमध्ये जाताना लोको पायलट आणि कर्मचारी यांच्यातील संवाद तुटला त्यामुळे मालगाडीचा मागील डबा संरक्षक भिंत तोडून थेट पार्किंग एरियात घुसला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App