दोन डोसमध्ये अंतर योग्यच, आदर पूनावाला यांच्याकडून केंद्राच्या निर्णयाचे स्वागत


लस उपलब्धता आणि लस घेण्यासाठी होणारी नागरिकांची गर्दी यातली तफावत वाढत असल्याने भारतीयांमध्ये अस्वस्थता निर्माण होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर कोव्हिशिल्ड लसीचे दोन डोस घेण्यादरम्यानचा कालावधी वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र हा निर्णय पूर्णतः शास्त्रीय आधारावर घेतला गेला असल्याने नागरिकांना काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही. जगातली सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी असलेल्या सीरमचे सीईओ आदर पुनावाला तसेच जागतिक आरोग्य संघटनेनेही यांनीदेखील केंद्राच्या या निर्णयाला दुजोरा दिला आहे. The gap between the two doses of Covishield is justified, Serum CEO Adar Poonawala welcomes the Centre’s decision


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोव्हिशिल्ड लसीचा पहिला डोस घेतल्यांतर दुसरा डोस घेण्याचा कालावधी 12 ते 16 आठवड्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे. यापूर्वी तो 6 ते 8 आठवडे इतका होता. केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याबरोबर लगेचच,

लस उपलब्ध नसल्याने हा निर्णय घेतला, त्यामुळे नागरिकांना कोरोनाचा धोका वाढू शकतो, या प्रकारची ओरड विशिष्ट वर्गाने सुरु केली होती. मात्र त्यात जराही तथ्य नसल्याचे सोनारानेच कान टोचल्याने स्पष्ट झाले आहे.जगातली सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी असलेल्या पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पूनावाला यांनी कोरोना लसीच्या दोन डोस घेण्यातील अंतर वाढवण्याच्या निर्णयाचे पूर्ण स्वागत केले आहे. केंद्र सरकारचा हा निर्णय अत्यंत शास्त्रीय आणि योग्य असल्याची ग्वाही पूनावाला यांनी दिली आहे.

एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पूनावाला यांनी सांगितले की, लस घेणाऱ्या व्यक्तीची प्रतिकारक्षमता वाढणे आणि लसीची शरीरातली परीणामकारकता वाढणे या दोन्ही दृष्टीने दोन डोसमधील अंतर वाढवण्याचा निर्णय उपयुक्त आहे. उपलब्ध होणाऱ्या डाटाच्या आधारे हा शास्त्रीय निर्णय घेण्यात आला आहे.

सध्या भारतातील अनेक राज्यांमध्ये लसींचा तुटवडा आहे. या पार्श्वभूमीवर दोन डोस घेण्यामधील अंतर वाढवण्याचा निर्णय लागू झाल्याने लस पुरवठ्यावरील ताण कमी होण्यासही मदत होणार आहे. सध्या देशात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसींचा पुरवठा होत आहे.

अंतर वाढवल्याने गरजू नागरिकांना विनामूल्य लस पुरवठा करण्यासही मदत होणार आहे. भारतात लसीकरणास सुरुवात झाली तेव्हा पहिल्या टप्प्यात दोन डोस देण्यामधील अंतर 4 ते 6 आठवडे होते. ते आता 6 ते 8 आठवडे असे केल्याने लसीची परिणामकारकता कमी होण्याचा जराही धोका नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

अलिकडेच झालेल्या अभ्यासानुसार लसीचे दोन डोस देण्यातील अंतर बारा आठवडे इतके ठेवल्यानंतरही तिची परिणामकारकता 81.3 टक्के आढळून आली आहे. या उलट सहा किंवा त्यापेक्षा कमी आठवड्यांच्या अंतरानंतर

दोन डोस घेतल्यास लसीची प्रभाव 55.1 असा कमी असल्याचे आढळून आले आहे. दरम्यान कोव्हिशिल्ड या लसीसाठीच दोन डोस घेण्यातील अंतर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोव्हॅक्सिनबाबत असा निर्णय झालेला नाही.

सरकारच्या नॅशनल टेक्निकल अँडव्हायजरी ग्रुप इम्युनायझेशनने दोन डोसमधील अंतर वाढवल्यास कोव्हिशिल्डची परिणामकारकता वाढेल अशी सूचना सरकारला केली होती. त्या आधारे सरकारने निर्णय घेतला आहे.

पीटीआय या वृत्तसंस्थेला मिळालेल्या माहितीनुसार इंग्लंडमध्ये कोव्हिशिल्ड लसीचा अनुभव लक्षात घेता 12 ते 16 आठवड्यांचे अंतर फायद्याचे ठरले असल्याचे दिसून आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनीही फेब्रुवारीमध्ये स्पष्ट केले होते की,

अँस्ट्राझेनका (हीच लस भारतात कोव्हिशिल्ड नावाने वितरीत केली जाते.)च्या कोरोना लसीचा दुसरा डोस देण्यास उशीर केल्याने तिची परिणामकारकता वाढत असल्याचे आढळून आले आहे.

The gap between the two doses of Covishield is justified, Serum CEO Adar Poonawala welcomes the Centre’s decision

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण