विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने करदात्यांना दिलासा देत प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्टवरून ३० सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. प्रत्यक्ष कर विकास से विश्वास कायद्याच्या कलम 3 अंतर्गत हा बदल करण्यात आला आहे. आयकर विभागाच्या नवीन पोर्टलमधील तांत्रिक उणिवांमुळे करदात्यांना रिटर्न भरणे कठीण जात होते. त्यामुळे ही मुदत वाढविण्यात आली आहे.The deadline for filing various applications with income tax returns has been extended by one month
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) यासंर्भात काढलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विवाद से विश्वास कायद्याअंतर्गत आवश्यकतेनुसार फॉर्म 3 जारी करताना आणि सुधारणा करताना येणाऱ्या अडचणींमुळे अंतिम तारीख 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. व्हीएसव्ही कायद्यांतर्गत अतिरिक्त रकमेशिवाय देय देण्याची अंतिम तारीख बदलली नाही आणि ती 31 आॅक्टोबर सारखीच राहील.
आयकर विभागाच्या नवीन पोर्टलमध्ये जाहीर करण्यात आलेल्या तांत्रिक उणिवांच्या दरम्यान नुकतीच अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसचे एमडी आणि सीईओ सलील पारेख यांच्यात बैठक झाली.
अर्थमंत्र्यांनी पारेख यांच्याशी झालेल्या बैठकीत नाराजी व्यक्त करताना पोर्टल सुमारे अडीच महिन्यांनंतरही सुरळीत का काम करत नसल्याचे सांगितले. पोर्टलमधील त्रुटी दूर करण्यासाठी अर्थमंत्र्यांनी इन्फोसिसला 15 सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे.
आयकर विभागाने रविवारी विविध अनुपालनांसाठी मुदत वाढवली आहे. सामान्यीकरण शुल्क आणि रेमिटेंस तपशील दाखल करणे समाविष्ट आहे. आर्थिक वर्ष 2020-21 साठी फॉर्म -1 मध्ये सामान्यीकरण शुल्क तपशील दाखल करण्याची अंतिम मुदत 30 जूनच्या मूळ मुदतीपासून 31 डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.
जून आणि सप्टेंबर तिमाहीसाठी पाठवलेल्या रेमिटन्सच्या संदर्भात अधिकृत डीलर्सद्वारे सादर केले जाणारे फॉर्म 15 मधील त्रैमासिक विवरण आता अनुक्रमे 30 नोव्हेंबर आणि 31 डिसेंबरपर्यंत दाखल केले जाऊ शकते. हे विवरणपत्र दाखल करण्याची मूळ मुदत अनुक्रमे 15 जुलै आणि 15 ऑक्टोबर होती.
करदात्यांना आणि इतर भागधारकांना काही विशिष्ट फॉर्म भरताना येणाºया अडचणींविषयी माहिती देण्यात आली आहे. हे लक्षात घेऊन हे फॉर्म ई-सबमिशनच्या तारखा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App