विशेष प्रतिनिधी
प्रयागराज : प्रयागराज हजारो वर्षांपासून आपली मातृशक्तीचे प्रतिक असून, गंगा-यमुना-सरस्वती या तिन्ही नद्यांच्या संगमाची ही धरती आहे. आज ही तीर्थनगरीही स्त्री आणि शक्तीचा असा अद्भुत संगम पाहत आहे. यूपीमध्ये महिलांच्या विकासासाठी आणि सक्षमीकरणासाठी जे काम झाले ते संपूर्ण देश पाहत आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केले.The country is seeing the work done in Uttar Pradesh for the development of women, the symbol of Prayagraj Matrishakti, Prime Minister lauds Yogi Adityanath
2022 मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशात मोदी सरकारकडून अनेक विकासाच्या योजना आखल्या जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयागराज दौºयावर असून, त्यांनी महिला केंद्रित उपक्रमाची सुरूवात केली.
यावेळी मोदींनी महिलांसाठी बचत गटांना आर्थिकदृष्ट्या परावलंबी बनविण्यासाठीची योजना सुरू केली आहे. पंतप्रधानांनी आज येथील बचत गटांना 1,000 कोटी रुपये हस्तांतरित केले. याचा फायदा उत्तर प्रदेशातील सुमारे 16 लाख महिलांना होणार आहे.
एका जनसभेला संबोधित करताना मोदी म्हणाले की, मी महिला बचत गटांच्या भगिनींना आत्मनिर्भर भारताचा चॅम्पियन मानतो, महिला बचत गट हे खरे तर राष्ट्रीय मदत गट आहेत. 2014 पूर्वीच्या 5 वर्षांत राष्ट्रीय उपजीविका अभियानांतर्गत देण्यात आलेल्या मदतीत गेल्या 7 वर्षांत जवळपास 13 पटीने वाढ झाली आहे.’
पंतप्रधान मोदींनी दीनदयाल उपाध्याय योजना आणि राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान अंतर्गत बचत गटांना ही रक्कम हस्तांतरित केले आहे. या अभियानांतर्गत, 80,000 बचत गटांना प्रति गट 1.10 लाख रुपयांचा सामुदायिक गुंतवणूक निधी मिळणार आहे. तर 60,000 बचत गटांना 15,000 रुपये प्रति गट असा फिरता निधी दिला जाईल.
या रॅलीत मोंदीनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे तोंडभरून कौतूक देखील केले आहे. ते म्हणाले की, ‘पाच वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात गुंडगिरी होती. सत्ताधारी नेत्यांशी या गुडांची ओळख होती. त्याचा सर्वाधिक परिणाम माज्या बहिणी आणि युपीच्या मुलींवर होत होता.
त्यांना रस्त्यावरून जाणे अवघड झाले होते. शाळा, कॉलेजला जाणे अवघड होते, काही बोलता येत नव्हते, कारण पोलिस स्टेशनला गेल्यावर गुन्हेगार, बलात्कारी यांची शिफारस करणारा फोन यायचा. योगींनी या गुंडांना त्यांच्या योग्य ठिकाणी पोहोचवले आहे.’ असे मोदी म्हणाले.
मोदी पुढे म्हणाले की, स्त्री भ्रूण हत्या थांबवावी यासाठी आम्ही ‘बेटी बचाओ, बेची पढाओ’ हे अभियान सुरू केले आहे. त्या माध्यमातून समाजाच जनजागृती करण्याचे प्रयत्न यूपीमध्ये सुरू आहे. आज राज्यात स्त्री जन्मदारात वाढ झाली असल्याचे देखील मोदी म्हणाले.
आम्ही गरोदर महिलांचे लसीकरण, रुग्णालयात प्रसूती आणि गर्भधारणेदरम्यान पोषण यावर विशेष लक्ष दिले. प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेंतर्गत गरोदरपणात महिलांच्या बँक खात्यात 5000 रुपये जमा केले. जेणेकरून त्यांना योग्य खाण्यापिण्याची काळजी घेता येईल.
उत्तर प्रदेशमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत दिलेल्या 30 लाख घरांपैकी 25 लाख घरांची नोंदणी महिलांच्या नावावर झाली आहे, असे म्हणत मोदींनी योगींच्या कामाचा दाखला दिला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App