शेतकरी आंदोलनात सहभागी आणखी एका शेतकऱ्याचा मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेमध्ये आला आढळून

विशेष प्रतिनिधी

दिल्ली : दिल्ली सीमा रेषेवर मागील एक वर्षापासून कृषी कायद्याविरोधात शेतकर्यांनी आंदोलन केले आहे. पण सरकारने अद्याप कोणताही प्रतिसाद या आंदोलनास दिलेला नाहीये. काही दिवसांपूर्वीच दिल्ली सीमारेषेवर आंदोलनात सहभागी झालेल्या या शेतकऱ्याचा मृतदेह बॅरिगेटला बांधलेला आढळून आला होता. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर असे निदर्शनास आले होते की, धार्मिक ग्रंथांचा अवमान केल्या प्रकरणात बाबत हा मृत्यू झाला होता.

The body of another farmer involved in the farmers’ agitation was found hanging on a gallows

नुकत्याच हाती आलेल्या बातमी अनूसार, बुधवारी सिंधू सीमेवर मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आणखी एका शेतकऱ्याचा मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेमध्ये आढळून आला आहे. या घटनेमुळे तिथे एकच खळबळ उडाली होती. मृत शेतकर्याचे नाव गुरप्रीत सिंग असे आहे. तो पंजाबमधील फतेहगढ साहिबच्या अमरोहा तहसीलमधील रुरकी येथील रहिवासी आहे.

सकाळी 6.30 च्या सुमारास या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर गुरप्रीत सिंग यांना रुग्णालयात नेण्यात आले. तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. सोमवारी सिंग गावी भेट देऊन सिंधू सीमेरेषेवर परत आले होते. दोन दिवस त्यांनी शेतकऱ्यांशी साधलेल्या संवादावरून कृषी कायद्यावरील अडथळ्यांवर त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. एक वर्षाहून अधिक काळ शेतकरी आंदोलन करूनही सरकार कोणताही निर्णय घेत नाही. यावर त्यांनी निराशा व्यक्त केली होती. अशी माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.


सिंघू सीमेवरील हत्येप्रकरणी 27 ऑक्टोबरला महापंचायत, निहंगांनी आंदोलन सोडण्यावर घेणार जनमत चाचणी


मृत्यूपूर्वी गुरुप्रीतसिंग यांनी कोणतीही चिठ्ठी लिहिलेले आढळून आलेली नाहीये. पण त्यांच्या डाव्या हातावर ‘जिम्मेदार’ हा शब्द लिहिलेला पोलिसांना आढळून आला आहे. या प्रकरणाबाबत अधिक माहिती देताना कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपअधीक्षक वीरेंद्रसिंह यांनी सांगितले, गुरुप्रीतसिंग त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि त्यांचा 21 वर्षांचा मुलगा आहे. ही हत्या आहे की आत्महत्या? याबाबत अजून कोणतीही माहिती मिळालेली नसली, तरी पोलिस दोन्ही बाजूंनी तपास करत आहेत. त्यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. त्यानंतर त्यांच्या मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल.

29 नोव्हेंबर पासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनावर शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे.

The body of another farmer involved in the farmers’ agitation was found hanging on a gallows

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात