विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशातील सर्वांत मोठ्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते गुंडागर्दी करतात, हे दुदैर्वी आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय जनता पक्षावर हल्लाबोल केला आहे. बुधवारी त्यांच्या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्यावर गुरुवारी प्रतिक्रिया व्यक्त केली.The biggest party in the country is hooligan, Arvind Kejriwal’s attack on BJP
या हल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी भारतीय जनता युवा मोर्चाच्या आठ कार्यकर्त्यांना अटक केली.ट्विटरवरून मुख्यमंत्री केजरीवाल यांनी भाजयुमोच्या हल्ल्याला उत्तर दिले. मला जिवाची पर्वा नाही. माझ्यासाठी देश महत्त्वाचा आहे.
देशातील सर्वांत मोठ्या पक्षाचे कार्यकर्ते गुंडागर्दी करतात, हे योग्य नाही. भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या निवासस्थानासमोर जाऊन निदर्शने केली होती. हा केजरीवाल यांना ठार मारण्याचा कट होता, असा आरोप आपच्या नेत्यांनी केला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App