वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये काही व्यक्ती आणि तत्वे मानवाधिकारासंबंधी काही विशिष्ट दृष्टिकोन ठेवून चर्चा करतात. यातून देशाची प्रतिमा बिघडते इतकेच नाही तर त्यांचा पक्षपाती दृष्टिकोन देखील मूळ मानवाधिकाराच्या संकल्पनेला धक्का पोहोचवतो, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या तथाकथित लिबरल्सना सुनावले आहे. The biased attitude of some people towards human rights tarnishes the image of the country; Prime Minister’s attack
राष्ट्रीय मानवाधिकार या संदर्भात आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. मानवाधिकार यासंबंधीचा दृष्टिकोण नि:पक्षपाती आणि सर्वांसाठी समान असला पाहिजे, अशी आग्रही भूमिका पंतप्रधानांनी मांडली. पंतप्रधान मोदी म्हणाले, की देशात गेल्या काही वर्षांमध्ये एक गोष्ट दिसून आली आहे की काही लोक त्यांच्या वैयक्तिक आणि स्वतःच्या गटाच्या हितासाठी मानवाधिकाराची व्याख्या आणि व्याप्ती सीमित करून ठेवतात. त्याच्याकडे राजकीय चष्म्यातून बघतात.
#WATCH | …Some people see human rights violations in some incidents but not in other similar incidents. Human rights are violated when viewed via political spectacles. Selective behaviour harmful to democracy. They attempt to harm nation's image through selective behaviour.: PM pic.twitter.com/5RsaIkMExw — ANI (@ANI) October 12, 2021
#WATCH | …Some people see human rights violations in some incidents but not in other similar incidents. Human rights are violated when viewed via political spectacles. Selective behaviour harmful to democracy. They attempt to harm nation's image through selective behaviour.: PM pic.twitter.com/5RsaIkMExw
— ANI (@ANI) October 12, 2021
एकाच घटनेकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची त्यांची सवय आहे. एका घटनेत त्यांना मानवाधिकाराचे उल्लंघन दिसते, पण तशाच प्रकारच्या दुसऱ्या घटनेत त्यांना मानवाधिकाराचे उल्लंघन दिसत नाही. असा दुटप्पी दृष्टिकोन ते बाळगतात आणि त्यातून देशाची प्रतिमा देखील आंतरराष्ट्रीय पातळीवर बिघडवतात, अशा कठोर शब्दांमध्ये पंतप्रधान मोदींनी लिबरल्सवर हल्ला चढविला. मानवाधिकार संबंधात केंद्र सरकारची भूमिका नि:पक्षपाती आणि सर्वांसाठी समान असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
भारत स्वतंत्र झाल्यानंतर गेल्या कित्येक दशकांपासून भारतातल्या मुस्लिम महिला ट्रिपल तलाक पासून मुक्ती मागत होत्या. केंद्र सरकारने दोन वर्षांपूर्वी ट्रिपल तलाक विरोधातला कायदा करून मुस्लिम महिलांना अधिकार प्रदान केले. त्याचबरोबर हाज यात्रेत त्यांना महरमचे बंधन होते. त्या बंधनातून देखील केंद्र सरकारने मुस्लिम महिलांना मुक्त केले, याची आठवण पंतप्रधान मोदी यांनी आवर्जून करून दिली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App