विशेष प्रतिनिधी
श्रीनगर – जम्मू- काश्मी रमध्ये दहशतवाद्यांचे कंबरडे मोडून काढण्यासाठी भारतीय लष्कराने कंबर कसली असून त्याचे परिणाम आता मोठ्या प्रमाणात दिसू लागले आहेत. शोपियाँ जिल्ह्यामध्ये सुरक्षा दले आणि दहशतवादी यांच्यात आज जोरदार चकमक झाली, यामध्ये दोन दहशतवादी ठार झाले असून त्यात लष्करे तैय्यबाच्या म्होरक्याचा देखील समावेश आहे.Terrorist killed in J and K
इशफाक दार ऊर्फ अबू अक्रम असे ठार झालेल्या दहशतवाद्याचे नाव असून याआधी अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये तो सहभागी होता, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. सर्वसामान्य नागरिक, पोलिस आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांवर झालेल्या हल्ल्यामागे त्याचाच हात होता. त्याच्यासोबत अन्य एक दहतशवादी माजीद इकबाल भट देखील ठार झाला आहे.
गुप्तचरांकडून माहिती मिळाल्यानंतर दक्षिण काश्मीखरच्या चेक-ए-सिद्दीक खान परिसरामध्ये सुरक्षा दलांनी तपास मोहीम सुरू केली होती. सुरक्षा दलाचे जवान रात्रभर या परिसराला घेराओ घालून होते.
हशतवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केल्यानंतर सुरक्षा दलांनी त्याला सडेतोड उत्तर दिले, यामध्ये दोन्ही दहशतवाद्यांचा खातमा झाला. इशफाक दार ऊर्फ अबू अक्रम हा लष्करे तैय्यबाचा म्होरक्या २००७ पासून काश्मी र खोऱ्यामध्ये सक्रिय होता.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App