भाजप नेत्याच्या घरावर हल्ला करणाऱ्या तीन दहशतवाद्यांना काश्मीरमध्ये लष्कराकडून कंठस्नान

वृत्तसंस्था

श्रीनगर : पुलवामा जिल्ह्यातील काकोपोरा येथे शुक्रवारी झालेल्या चकमकीत तीन दहशवतवाद्यांना ठार करण्यास जम्मू-काश्मीशर पोलिस व सुरक्षा दलांना यश आले. नौगाम येथे भाजप नेत्याच्या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्यात यातील दोन दहशतवाद्यांचा हात होता.
या चकमकीत एका तरुणीसह दोन जण जखमी झाले आहेत. Terrorist attacked in Jammu

काश्मीरचे पोलिस महानिरीक्षक विजय कुमार म्हणाले की, पुलवामा जिल्ह्यातील काकोपोरा येथील धोबी मोहल्ला परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्याने सुरक्षा दलांनी शुक्रवारी पहाटे साडेचारच्या दरम्यान परिसराला वेढा घालून शोध मोहीम सुरू केली तेव्हा दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्याला जवानांनी प्रत्युत्तर दिले. त्यावेळी दहशतवाद्यांनी बचावासाठी नजीकच्या घरात आसरा घेतला. त्यांनी पाच नागरिकांना ओलिस धरल्याने ही कारवाई सकाळपर्यंत लांबली.अखेर तिन्ही दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यास सुरक्षा दलांना यश आले. सुहेल निसार लोण, यासिर वणी आणि जुनैद अशी त्यांची नावे आहेत. चकमकीच्या ठिकाणी शस्त्र व दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. भाजप नेते अन्वर अहमद यांच्या नौगाममधील घरावर काल झालेला हल्ला अल बादर आणि लष्करे तैयबा या दहशतवादी संघटनांनी संयुक्तरित्या केला असल्याचे उघड झाले असून ठार झालेल्या तीनपैकी दोन दहशतवादी या संघटनेचे काम करीत होते.

Terrorist attacked in Jammu

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*